केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अनेकदा त्या गमतीदार व्हिडीओ किंवा फोटो शेअर करीत आपल्या फॉलोवर्सला मजेशीर सल्ले देतात. स्मृती इराणींनी इन्स्टाग्रामवर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील प्रसिद्ध पात्र ‘दयाबेन’ आणि ‘जेठालाल’ यांच्या दोन क्लिप शेअर केल्या आहेत. हा व्हिडीओ शेअर करून त्यांनी आपल्या चाहत्यांना लग्नाआधी बदाम खाण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा : एके काळी घराचे भाडे द्यायलाही नव्हते पैसे…आज आहे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा ‘अर्जुन’

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Lakshmi Niwas Fame Meenakshi Rathod Daughter Yara sing Majha Bhimraya song
Video: ‘लक्ष्मी निवास’ नव्या मालिकेत झळकणाऱ्या अभिनेत्रीच्या चिमुकल्या लेकीनं गायलं ‘माझा भिमराया’ गाणं, व्हिडीओ पाहून कराल कौतुक
a groom said amazing ukhana for bride
“मेथीची भाजी आहे स्वस्त…” नवरदेवाने घेतला भन्नाट उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “जराही रोमँटिक नाहीस तू…”, तेजूच्या हळदीत तुळजा सूर्यावर रूसणार; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा प्रोमो पाहिलात का?

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील ‘दयाबेन’ आणि ‘जेठालाल’ या दोन पात्रांचे व्हिडीओ स्मृती इराणींनी शेअर केले आहेत. यामध्ये पहिल्या क्लिपमध्ये जेठालाल दयाबेनला विचारत असतो, “जेव्हा देव अक्कल वाटत होता तेव्हा तू कुठे होतीस?” यावर दयाबेन उत्तर देते की, “मी तेव्हा तुमच्यासोबत सप्तपदी घेत होते.” त्यानंतर स्मृती इराणींनी शेअर केलेल्या दुसऱ्या क्लिपमध्ये दयाबेन जेठालालला विचारते, “मला सांगा एक किलोमध्ये किती गहू असतात?” जेठालालने माहीत नाही, असे उत्तर दिल्यावर दयाबेन त्याला बदाम खायला देते आणि नंतर विचारते, “आता सांगा एक डझनमध्ये किती केळी असतात?” यावर जेठालाल उत्तर देतो “बारा”. यानंतर दयाबेन पटकन म्हणते, “पाहिलीत बदामाची कमाल.”

हेही वाचा : “शाहरुख-सलमान असो किंवा आमिर जेव्हा त्यांच्याकडे…” नवाजुद्दिनने सांगितला सुपरस्टार्ससोबत काम करण्याचा अनुभव

स्मृती इराणींनी हे दोन्ही व्हिडीओ शेअर करून सर्वांना ‘मॅरिज अ‍ॅडव्हाइस’ दिला आहे. कॅप्शनमध्ये त्या लिहितात, “या गोष्टीचे तात्पर्य असे की, ज्यांनी लग्न केले आहे त्यांनी सर्वांनी बदाम खाणे गरजेचे आहे. #दयाभाभीरॉक्स.”

स्मृती इराणींनी शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेक युजर्सच्या प्रतिक्रिया येत आहेत. यामध्ये अनेकांनी तुमचा ‘सेन्स ऑफ ह्युमर’ अतिशय चांगला आहे, असे म्हणत त्यांना दाद दिली आहे. तसेच काहींनी स्मृती इराणींना दयाबेनला ( दिशा वाकानी ) या मालिकेत पुन्हा आणण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या, अशी विनंती केली आहे.

Story img Loader