केंद्रीय मंत्री स्मृती इराणी एकेकाळी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांनी ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेत साकारलेल्या तुलसी या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. अलीकडेच स्मृती इराणी यांनी रणवीर अल्लाहबादियाच्या (Beerbiceps)पॉडकास्टला हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा करत काही जुन्या आठवणी सांगितल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “लहानपणी शारीरिक शोषण…”, शाहिद कपूरने ४ वर्षांनी केला ‘कबीर सिंग’मधील ‘त्या’ वादग्रस्त सीनबाबत खुलासा

स्मृती इराणी म्हणाल्या, “माझ्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर मला दोन दिवसांनी बालाजीच्या सेटवर जावे लागले होते. तेव्हा माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यावेळी बालाजी प्रॉडक्शन हाऊसच्या जुन्या कार्यालयात एका मोडक्या रस्त्यावरून जावे लागले होते. माझे कॅमेरामन आणि मेकअपमन कारने यायचे पण, मी रिक्षाने प्रवास करायचे. त्यावेळी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे आजही हाडांचा त्रास होतो.”

हेही वाचा : “सातारा म्हंजी काळजाचा तुकडा…”, किरण मानेंनी जन्मभूमीसाठी शेअर केली भावुक पोस्ट; नेटकरी म्हणाले, “दादा तुम्ही ग्रेट”

स्मृती इराणी पुढे म्हणाल्या, माझ्या नवऱ्याला नोकरी लागल्यामुळे तो परदेशी गेला. इथले सर्वकाही मला एकटीला पाहायचे होते. माझे कॅमेरामन, मेकअपमन मला नेहमी तुम्ही काय करताय? कुठे चुकून पडलात तर? असे नेहमी सांगायचे. तेव्हा मी फक्त २४ ते २५ वर्षांची होती. मालिकेत काम करण्यासह मला माझ्या नवजात बाळाचीही काळजी घ्यायची होती. तेव्हा पैशांची नितांत आवश्यकता होती. याच कारणाने मला बाळ झाल्यावर दोन दिवसांनी लगेच काम करावे लागले.

हेही वाचा : “तू गे आहेस ना?”, विचारलेल्या प्रश्नावर करण जोहरने दिले थेट उत्तर; म्हणाला, “तुला माझ्यात…”

“मालिकेतील तुलसी या पात्राची सर्वजण आजही आठवण काढतात, कौतुक करतात. परंतु, त्या एका भूमिकेसाठी मी काय काय केले आहे ते कोणालाच माहिती नाही. एक वेळ अशी होते जेव्हा माझ्याकडे फक्त २०० रुपयेच होते. अजून बिकट परिस्थिती येऊ नये म्हणून, अंगात ताप असूनही मी नोकरीच्या शोधात फिरले. तेव्हा घरी आल्यावर वाटायचे की, मला नोकरी नाही मिळाली तर माझे काय होईल. माझ्याशिवाय घरात कोणीच नव्हते. तो काळ मी कधीच विसरू शकत नाही.”, असे स्मृती इराणींनी या पॉडकास्टमध्ये सांगितले.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smriti irani recalls returning to balaji set two days after giving birth because she had no money sva 00