‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या लोकप्रिय मालिकेमुळे स्मृती इराणी प्रसिद्धीझोतात आल्या. यात त्यांनी ‘तुलसी विरानी’ ही भूमिका साकारली होती. छोट्या पडद्यावर यश मिळवल्यानंतर पुढे काही वर्षांनी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सध्या त्या देशाच्या केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. अलीकडेच स्मृती इराणी यांनी ‘कर्ली टेल्स’च्या मुलाखतीला खास उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ ही लोकप्रिय मालिका ३ जुलै २००० साली प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यानंतर जवळपास ७ ते ८ वर्ष या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. यामधल्या बहुचर्चित तुलसी या भूमिकेविषयी सांगताना स्मृती इराणी म्हणाल्या, “‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ ही मालिका मला माझ्या व्यक्तिमत्त्वामुळे मिळाली नव्हती. या मागची गोष्ट खूपच वेगळी आहे. त्या दिवशी एकता कपूरच्या ऑफिसमध्ये जनार्दन नावाचे एक ज्योतिष बसले होते. त्यांनी मला सांगितलं की, ‘एक दिवस तू खूप मोठी स्टार होणार आहेस’ ते माझ्याशी बोलत असताना मी एका कॉन्ट्रॅक्टवर सही करत होते. प्रत्यक्षात ती भूमिका कोणाच्या तरी बहिणीची वगैरे होती. परंतु, हे सगळं पडद्यामागे बसलेल्या एकता कपूरने पाहिलं. त्यांनी एकताला सांगितलं की, ‘तू हिच्याबरोबर काम केलंस तर, एक दिवस ही मुलगी देशभरात प्रसिद्ध होईल.’ पंडितजी यांचं बोलणं ऐकून एकता लगेच मी नेमक्या कोणत्या करारावर सही करतेय हे पाहण्यासाठी बाहेर आली.”

हेही वाचा : किरण रावमुळे आमिर खान-रीना दत्ताचा घटस्फोट झाला? दिग्दर्शिका म्हणाली, “लगानच्या शूटिंगपासून आम्ही…”

स्मृती इराणी पुढे म्हणाल्या, “एकताने ते संपूर्ण कॉन्ट्रॅक्ट पाहिलं आणि फाडून टाकलं. त्यानंतर तिने मला तुलसी विरानीच्या भूमिकेसाठी कास्ट करायचं ठरवलं. त्या भूमिकेसाठी मला दिवसाला अठराशे रुपये मानधन देण्यात यायचं. खरंतर, एकताने कॉन्ट्रॅक्ट फाडल्यावर मला धक्का बसला होता. परंतु, त्यानंतर लगेच तिने मला सगळी नवीन कागदपत्र दिली. एकताने मला किती पगार पाहिजे याबद्दल विचारलं तेव्हा तिला मी बाराशे रुपये प्रतिदिवस सांगितलं होतं. पण, एकताने स्वत:हून त्या करारावर अठराशे प्रतिदिवस मानधन लिहिलं होतं. मला अगदी आयुष्यात लॉटरी जिंकल्यासारखं वाटत होतं.”

हेही वाचा : “अजून तुझ्या हृदयात धडधड…”, अमेय वाघची ‘ती’ कविता ऐकून श्रेयस तळपदे भावुक, पत्नीचेही डोळे पाणावले

एकता कपूरच्या मालिकेत काम करण्यापूर्वी स्मृती इराणी यांनी आयुष्यात अनेक कठीण प्रसंग अनुभवले होते. याविषयी त्या सांगतात,”मालिकेत काम करण्यापूर्वी मी मॅकडोनाल्ड कंपनीमध्ये क्लिनर म्हणून कार्यरत होते. त्यावेळी वयाच्या २३ व्या वर्षी मला महिन्याला अठराशे रुपये पगार होता. अर्थात काम करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. अशा परिस्थितीत मालिका मिळाल्यावर महिन्याचा पगार मला दिवसाला मिळणं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती.”

हेही वाचा : “हृषिकेश रावांना भरवते…”, ‘घरोघरी मातीच्या चुली’ फेम जानकीने घेतला खास उखाणा, लवकरच सुरू होणार नवी मालिका

दरम्यान, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ ही हिंदी कलाविश्वात टेलिव्हिजनवर सर्वाधिक काळ चालणारी मालिका होती. या मालिकेमुळे स्मृती इराणींनी मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. मालिका संपल्यावर काही वर्षांनी त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smriti irani recalls working at mcdonals and when she was cast as tulsi virani sva 00