केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या त्यांच्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. तसंच त्या सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. स्मृती इराणी यांनी आता एक फोटो शेअर केला आहे. या फोटोची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. एवढंच नाही तर स्मृती इराणी यांच्या या फोटोवर मंदिरा बेदी, मौनी रॉय, एकता कपूर, मनिष पॉल यांनी कमेंटही केल्या आहेत. स्मृती इराणी यांचा हा फोटो २१ वर्षांपूर्वीचा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्मृती इराणींना का केला हा फोटो पोस्ट?

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी २१ वर्षांपूर्वीचा त्यांचा फोटो पोस्ट केला आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे सोशल मीडियावर आलेला एक ट्रेंड. २१ वर्षांपूर्वीचे फोटो अनेकजण थ्रोबॅक फोटो म्हणून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या ट्रेंडचाच एक भाग म्हणून स्मृती इराणी यांनी आपला २१ वर्षांपूर्वीचा फोटो शेअर केला आहे. जो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतो आहे.

स्मृती इराणी यांच्या फोटोत काय?

स्मृती इराणी यांनी २१ वर्षांपूर्वीचा मॉडेलिंग करतानाचा फोटो आहे. यामध्ये फ्लोअर आऊटफिटमध्ये दिसून येतं आहे. या फोटोसह खो गये हम कहाँ हे गाणंही पोस्ट केलं आहे. यावर एकता कपूर यांनी लिहिलं मी या मुलीला ओळखते. तिला पाहिलं आणि ठरवलं की ही माझी स्टार आहे. मंदिरा बेदी म्हणाले वॉव, हा फोटो खूपच गोड आहे. मनिष पॉलने अरे वा म्हणत कमेंट केली आहे. तर काही युजरने आता तो निरासगसपणा हरवला आहे म्हटलं आहे.

हे पण वाचा-“कुठल्या समलिंगी पुरुषाला पाळी येते, फक्त लक्ष..”, महिलांच्या रजेवरून वादानंतर स्मृती इराणी यांचं नवं विधानही चर्चेत

स्मृती इराणी एके काळच्या मॉडेल

स्मृती इराणी यांनी करिअर सुरु केलं ते मॉडेलिंगपासून. मनोरंजन विश्वातील त्यांचा प्रवास अनेक चढउतारांचा होता. स्मृती इराणी या कमी वयात मुंबईत करिअर करण्यासाठी आल्या होत्या. बराच काळ संघर्ष केल्यानंतर त्यांनी मॉडेलिंग विश्वात पाऊल ठेवलं होतं. स्मृती इराणींनी ‘मिस इंडिया’ या सौंदर्यस्पर्धेतही भाग घेतला होता. या सौंदर्यस्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत त्यांनी बाजी मारली होती. यानंतर त्यांनी काही मॉडेलिंग कँपेन्सही केले होते. ‘क्यूँ की सांस भी कभी बहू थी’ या मालिकेतील मुख्य भूमिकेसाठी स्मृती इराणींची निवड झाली. त्यानंतर स्मृती इराणी या घराघरांत पोहचल्या. या मालिकेत स्मृती इराणींनी ‘तुलसी’ हे पात्र साकारलं होतं जे लोकांच्या आजही स्मरणात आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smriti irani shares major throwback picture from her modelling days ekta kapoor comments on that scj