स्नेहा वाघने मराठी कलाविश्वाबरोबरच हिंदीतही जम बसवला. अनेक उत्कृष्ट भूमिका साकारून स्नेहाने अभिनयाचा ठसा उमटवला. मालिकांमध्ये काम करून प्रसिद्धी मिळवणारी स्नेहा बिग बॉस मराठी मध्येही सहभागी झाली होती. सध्या स्नेहा ‘ना उम्र की सीमा हो’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत ती नकारात्मक भूमिकेत आहे.

‘ना उम्र की सीमा हो’ मालिकेत साकारत असलेल्या नकारात्मक भूमिकेमुळे लोक द्वेष करत असल्याचा खुलासा स्नेहाने केला आहे. ईटाइम्सच्या वृत्तानुसार, स्नेहाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत भाष्य केलं आहे. स्नेहा म्हणाली, “६-७ महिन्यांपासून मी मालिकेत अंबा ही व्यक्तिरेखा साकारत आहे. पण माझ्या या नकारात्मक भूमिकेमुळे लोक माझा द्वेष करत आहेत. कलाकार फक्त भूमिका साकारत असतात. त्यांच्या भूमिकेवरुन त्यांच्याबद्दल मत बनवणं चुकीचं आहे, हे प्रेक्षकांनी समजून घेतलं पाहिजे.”

Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच
Meera Jaggnath
ज्याच्यासाठी साखरपुडा मोडला तो मुलगाच…; ‘ठरलं तर मग’फेम मीरा जगन्नाथने केला खुलासा; म्हणाली, “सहा महिन्यांनी…”
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”
Rakesh Roshan And Jitendra
“मी आणि जितेंद्र…”, बॉलीवूड दिग्दर्शक राकेश रोशन म्हणाले, “त्याने आम्हाला शिवीगाळ…”
auto driver who rushed saif ali khan refused to disclose amount he got
जखमी सैफला रिक्षातून रुग्णालयात नेणाऱ्या चालकाला किती बक्षीस मिळालं? म्हणाला, “माझ्यासाठी तो…”

हेही वाचा>> शहनाझ गिलबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर राघव जुयालने सोडलं मौन, म्हणाला…

स्नेहाने एका चाहतीबरोबरचा किस्साही सांगितला. “एका कार्यक्रमादरम्यान महिला पोलीस अधिकारी मला भेटायली आल्या. त्यांना माझं काम आवडत होतं. पण, ‘ना उम्र की सीमा हो’ मालिकेतील माझी भूमिका त्यांना आवडत नव्हती. कलाकार आणि त्यांनी मालिकेत साकारलेल्या भूमिकेचा वेगळा विचार करणं, शक्य होत नसल्याचं त्यांनी मला सांगितलं. यापुढे मी सकारात्मक भूमिकेत दिसण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली,” असं स्नेहा म्हणाली.

हेही वाचा>> ‘कबीर सिंग’मधील काम पाहून शाहीद कपूर वनिता खरातला काय म्हणाला? अभिनेत्रीने केला खुलासा

पुढे स्नेहा म्हणाली, “मला वाटतं माझी भूमिका मी योग्यप्रकारे साकारत आहे. त्यामुळे माझ्या भूमिकेबद्दल लोकांना इतका द्वेष वाटतो. प्रेक्षक अभिनेत्री म्हणून माझं कौतुक करतात. त्यांना माझं काम आवडतं. पण भूमिका आणि कलाकार वेगळे असतात, हे प्रेक्षकांनी समजून घ्यायला हवं.”

Story img Loader