‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पृथ्वीक प्रतापचं एक स्वप्न पूर्ण झालं आहे. दोन दिवसांपूर्वी म्हाडाचं घर पृथ्वीकच्या नावावर झालं. त्याचा आवडता अभिनेता शाहरुख खानच्या वाढदिवशी म्हणजेच २ नोव्हेंबर रोजी घर नावावर झालं, अशी आनंदाची बातमी त्याने पोस्ट करत शेअर केली होती. आता ‘चला हवा येऊ द्या’ फेम स्नेहल शिदमने पृथ्वीकचं नवीन घरासाठी अभिनंदन केलंय. तसेच एक पोस्टही लिहिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाहरुख खानच्या वाढदिवशी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची मन्नत झाली पूर्ण; नवं घर झालं नावावर

पृथ्विक प्रतापची पोस्ट

“आजवर अनेक स्वप्न पाहिली… अनेक पूर्ण केली…अनेक स्वप्न जगली आणि अनेक स्वप्न भंगलीसुद्धा, पण एक स्वप्न जे आजपर्यंत हुलकावणी देत होतं ते पूर्णत्वाला आलं…
आयुष्याची ३० वर्षे आश्रितासारखी काढलेल्या प्रत्येकाला एक दहा बाय दहाचं छप्परही आभाळापेक्षा कमी नसतं…

आज स्वतःच्या घरापुढे उभं राहून हा फोटो काढताना खरच आभाळ ठेंगणं झाल्यासारख वाटतंय. घर छोटं आहे पण माझ्या कुटुंबाचं आहे. ही स्वप्नपूर्तीची वाटचाल अजून अशीच सुरु राहणार आहे कारण ‘Penthouse’ अभी बाकी है मेरे दोस्त…!

गंमत म्हणजे आज २ नोव्हेंबरला हे घर माझ्या नावावर झालंय म्हणजे ‘शाहरुख खान’च्या वाढदिवशी, त्यामुळे माझी ‘मन्नत’ पूर्ण झाली असं म्हणायला हरकत नाही,” अशी पोस्ट त्याने केली होती.

स्नेहल शिदमची पोस्ट

स्नेहल शिदमने पृथ्वीकची पोस्ट स्टोरीला शेअर करत सुंदर कॅप्शन दिलं. “घर जरी छोटं असलं तरी तुझी स्वप्नं मोठी आहेत. एक असाही दिवस येईल जेव्हा घरंही मोठं असेल आणि तो दिवस दूर नाही. अभिनंदन दादू, लव्ह यू,” असं स्नेहलने लिहिलं.

स्नेहल शिदमची पोस्ट

दरम्यान, पृथ्वीक प्रतापने नवीन घराची पोस्ट शेअर केल्यावर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील निखिल बने, प्रियदर्शिनी इंदलकर, वनिता खरात, दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्यासह अभिनेत्री पूजा सावंत, श्रृती मराठे यांनीही कमेंट करत शुभेच्छा दिल्या.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Snehal shidam post after maharashtrachi hasyajatra fame prithvik pratap bought new home hrc