कलर्स वाहिनीवरील ‘झलक दिखला जा’ या लोकप्रिय शोचा १०वा सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. नुकतंच या शोमध्ये सोशल मीडिया स्टार किली पॉलने हजेरी लावली. पॉलने त्याच्या डान्सने शोला चार चांद लावले. यावेळी धक धक गर्ल माधुरी दीक्षितसह त्याने हिंदी गाण्यावर ठेकाही धरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘झलक दिखला जा’ शोचे बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित परिक्षण करत आहे. या शोमध्ये किली पॉल माधुरी दीक्षितसह ‘चने के खेत में’ गाण्यावर थिरकला. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ माधुरी दीक्षितच्या फॅन पेजवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये किली पॉल आणि माधुरी दीक्षित गाण्याच्या हुक स्टेप्स करताना दिसत आहेत. शोमध्ये पॉलने माधुरी दीक्षितचा तो चाहता असल्याचं म्हणत तिच्यासाठी गाणं गाण्याची इच्छा ही व्यक्त केली. ‘झलक दिखला जा’च्या सेटवर ‘राता लंबिया’ हे गाणं त्याने माधुरीसाठी गाऊन त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा >> Video : प्राजक्ता सूत्रसंचालनाची तयारी कशी करते?, अभिनेत्रीने शेअर केला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सेटवरील खास व्हिडीओ

हेही पाहा >> Photos : दहावीत तीनदा नापास, तुरुंगवास ते जॅकलिन फर्नांडिसला डेट…’बिग बॉस’मधील साजिद खानबद्दलच्या खास गोष्टी माहीत आहेत का?

कोण आहे किली पॉल?

किली पॉल हा सोशल मीडिया स्टार आहे. तो मुळचा टांझानिया येथे राहणारा आहे. बहीण नीमा पॉल आणि तो इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध आहेत. बॉलिवूड गाण्यांवर ते दोघेही रिल्स बनवतात. त्यांचे इन्स्टाग्रामवर ४२ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. टांझानियातील भारतीय उच्चायुक्त बिनिया प्रधान यांनी भारतीय दूतावासात किलीला बोलावून त्याचा सत्कारही केला होता.

हेही वाचा >> प्रिया बापटचा वेब सीरिजमधील बोल्ड सीनचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आई म्हणाली, “चूक झाली…”

किली पॉलचे बॉलिवूड गाण्यांवरील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही होत असतात. तो ‘बिग बॉस हिंदी’च्या नव्या पर्वात दिसणार असल्याचीदेखील चर्चा आहे. वाइल्ड कार्ड म्हणून किली पॉल ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेणार असल्याचं बोललं जात आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social media star kili paul dance with bollywood actress madhuri dixit on jhalak dikhlaja set kak