‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील अभिनेत्री स्पृहा जोशीची नवी मालिका ‘सुख कळले’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेत स्पृहासह अभिनेता सागर देशमुख, ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले, बालकलाकार मिमी खडसे पाहायला मिळणार आहेत. नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो समोर आहे; ज्याची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. या मालिकेत महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर व अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहम एक महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे.

सोहम बांदेकरने ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेची चांगलीच चर्चा रंगली होती. आता सोहम स्पृहा जोशीच्या नव्या मालिकेत एक महत्त्वाची जबाबदारी सांभाळणार आहे.

cm Devendra fadnavis loksatta
महाकालीचे दर्शन शुभसंकेत, ठरवल्यापेक्षा मोठे काम होणार – फडणवीस
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Novel sports Competition Rita Bullwinkle
रेंगाळत ठेवणारी मनलढाई…
Ravindra Chavan responsibility BJP state president post
भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांना प्रतीक्षा
Bengaluru Crime News
मुलांना विष पाजलं, स्वत:ही केली आत्महत्या; बंगळुरूत दाम्पत्याचं धक्कादायक कृत्य; मरणापूर्वी लिहिला सविस्तर ईमेल!
गर्भपाताची मागणी करणाऱ्या पालकांच्या भूमिकेचे आश्चर्य,उच्च न्यायालयाची टिप्पणी; मुलगी गतिमंद असल्याच्या दाव्यावरूनही ताशेरे
Ramdas Athawale confirms Rahul Gandhi allegations regarding Somnath Suryavanshi Nagpur news
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच; राहुल गांधी यांच्या आरोपाला आठवलेंकडून दुजोरा
Mother murder daughter Nagpur, Nagpur,
प्रेमात अडसर ठरणाऱ्या सख्ख्या मुलीचा आईनेच केला खून, मृतदेहाची विल्हेवाट…

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’मधील अभिनेता झळकला ‘नवरी मिळे हिटलरला’ नव्या मालिकेत, साकारतोय ‘ही’ महत्त्वाची भूमिका

सोहम सध्या अभिनयासह निर्मितीची धुराही सांभाळताना दिसत आहे. ‘सोहम प्रोडक्शन हाऊस’ याचं काम सोहम पाहत आहे. या प्रोडक्शन हाऊसच्या सध्या दोन मालिका ‘ठरलं तर मग’, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिका सुरू आहेत. आता याचं प्रोडक्शन हाऊसची आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ती म्हणजे स्पृहाची ‘सुख कळले’ मालिका. त्यामुळे या मालिकेत सोहम निर्मित्याच्या भूमिकेत असणार आहे.

हेही वाचा – Video: स्पृहा जोशी-सागर देशमुखच्या ‘सुख कळले’ मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित, कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या…

दरम्यान, सोहम ‘नवे लक्ष्य’ या मालिकेपूर्वीपासून निर्मितीची जबाबदारी सांभाळत आहे. त्याने ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘ललित २०५’ या मालिकेच्या निर्मितीची धुरा सांभाळली होती. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, संग्राम समेळ, अमृता पवार, अनिकेत केळकर, सागर तळशीकर महत्त्वाच्या भूमिकेत होते. या मालिकेनंतर सोहमने अभिनय क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला होता.

Story img Loader