राखी सावंतचा दुसरा पती आदिल खान दुर्रानीने दुसरं लग्न केलं आहे. त्याने ‘बिग बॉस १२’ फेम सोमी खानशी जयपूरमध्ये निकाह केला. त्यानंतर बंगळुरूमध्ये त्यांचं रिसेप्शन पार पडलं. आदिल व सोमीने लग्नाचे फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली होती. राखीमुळे चर्चेत राहिलेल्या आदिलशी लग्न करणाऱ्या सोमीने पहिली भेट ते लग्नाचा निर्णय याबाबत माहिती दिली आहे.

सोमी-आदिलची पहिली भेट कुठे झाली?

सोमी खान म्हणाली, “आमचे लग्न ३ मार्चला झाले होते, आम्ही शूटिंगदरम्यान भेटलो होतो. पण आम्ही एका अवॉर्ड शोमध्ये भेटलो आणि आम्ही एकमेकांना ओळखून सात महिने झाले आहेत. आम्ही सुरुवातीला मित्र झालो आणि नंतर आमच्यात एकमेकांबद्दल प्रेमाची भावना निर्माण झाल्या आणि आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.”

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
Shabana Azmi
शबाना आझमी व जावेद अख्तर यांनी नाते संपवण्याचा घेतलेला निर्णय; खुलासा करीत म्हणाल्या, “आम्ही तीन महिने…”
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो

राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खानने केलं दुसरं लग्न, कोण आहे त्याची दुसरी पत्नी? जाणून घ्या

लग्न गुपचूप केलेलं नाही – सोमी

“आम्ही गुपचूप लग्न केलं नाही. आम्हाला लग्न करायचं होतं पण ते खासगी ठेवायचं होतं. आम्हाला कोणतीही नकारात्मकता, वाद किंवा पब्लिसिटी स्टंट नको होता. आम्हाला लग्न फक्त आमच्या कुटुंबांपुरतंच ठेवायचं होतं. त्यामुळे आमच्या पालकांनी लग्नाचा दिवस निश्चित केला आणि त्या दिवशी आमचे लग्न झाले,” असं सोमी म्हणाली.

आदिल खानच्या दुसऱ्या लग्नावर राखी सावंतची प्रतिक्रिया; म्हणाली, “मला त्याच्या लग्नाबद्दल…”

आदिलच्या कुटुंबाबद्दल काय म्हणाली सोमी?

“आदिलच्या कुटुंबासोबतचं माझं नातं खूप चांगलं आहे. मी जयपूरची आहे तर आदिलचे कुटुंब दक्षिण भारतातील आहे त्यामुळे एकमेकांना जाणून खूप छान वाटले. या लग्नामुळे सर्वजण खूप आनंदी आहेत. आदिलच्या कुटुंबीयांकडून लग्नाआधी आणि नंतरही अनेक विधी करण्यात आले. माझ्या स्वागतासाठी माझ्या सासरच्या घरी काही सुंदर विधी झाले. आदिल आता जयपूरचा जावई आहे, आम्ही लवकरच आमच्या लग्नाच्या विधींचे फोटो शेअर करणार आहोत. आदिलच्या कुटुंबासमवेत बंगळुरूमध्ये आमचं रिसेप्शन होतं,” अशी माहिती सोमीने दिली.

सोमी खानशी दुसरं लग्न नाही तर…; आदिल खान स्वतः खुलासा करत म्हणाला, “हे माझं…”

​आदिल व राखीच्या वादाबद्दल सोमीची प्रतिक्रिया

“मला माहित आहे की आदिलने खूप काही सहन केलं आहे, पण आता आम्ही एका नव्या प्रवासाला एकत्र सुरुवात केली आहे. त्यामुळे मला मागे वळून बघायचं नाही. मला त्या मुलाखती आणि व्हिडीओ कधीच बघायचे नव्हते, मी फक्त आदिलसोबत माझं भविष्य पाहत आहे, त्याचा भूतकाळ नाही,” असं सोमी म्हणाली.

Story img Loader