नुकताच वर्षाचा पहिला सण मकरसंक्रांत पार पडला. यंदा मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार विवाह बंधनात अडकलेत; या सर्वच जोडप्यांनी त्यांची पहिली मकरसंक्रांत मोठ्या जल्लोषात साजरी केली. सोशल मीडियावर नवविवाहित कलाकारांच्या जोड्यांनी त्यांचे मकरसंक्रांत साजरी करतानाचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. तसेच काहींनी माध्यमांना मुलाखतीही दिल्या आहेत. यातील सोनाली गुरव अन् अभिषेक गावकर या जोडप्याने त्यांच्या लग्नाआधीचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. तो किस्सा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

मकरसंक्रांतनिमित्त अभिषेक गावकर आणि सोनाली गुरव या दोघांनी ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत सोनालीने लग्न होण्याआधी त्यांच्या कुटुंबीयांसोबतचा एक किस्सा शेअर केला आहे. यात सोनालीने सांगितलं की, “माझी आणि अभिषेकची आई फार जास्त धार्मिक आहे, त्यामुळे त्यांनी लग्न करण्याआधी पत्रिका पाहण्याचं ठरवलं. पण, माझे वडील याच्या पूर्ण विरोधात होते. ते म्हणाले, नाहीच जुळली पत्रिका आणि त्यात वाईट सांगितलं तर तुम्ही लग्न नाही करणार का? मात्र, पत्रिका जेव्हा आली तेव्हा सर्वांनाच आनंद झाला.”

siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
aamir khan kiran rao
“त्याची आई अजूनही…”, किरण रावचं आमिर खानच्या कुटुंबाबद्दल भाष्य; त्याच्या मुलांची नावं घेत म्हणाली…
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी खरं सांगत नसतील तर त्यांना…”, बजरंग सोनावणेंचं वक्तव्य
Bhushan Prabhan
“कलाकार म्हणून आपण एकमेकांचा आदर करणं शिकलो नाही”, भूषण प्रधानकडून खंत व्यक्त; म्हणाला…

हेही वाचा : कुटुंबातील इतर सदस्य…”, पती सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबद्दल करीना कपूरची पहिली प्रतिक्रिया

“आम्ही खूप भांडतो” – अभिषेक गावकर

सोनालीने हा किस्सा सांगितल्यानंतर पत्रिकेतील गुणांवरून अभिषेक पुढे म्हणाला की, “आमच्या बऱ्याच गोष्टी एकमेकांशी जुळतात आणि त्या अगदी सहज जुळतात. असं नाही की आमच्यात भांडणं होत नाहीत. आम्ही खूप भांडतो. प्लस मायनस असं आहे, त्यामुळे जे पटत नाही तेसुद्धा पटकन मॅनेज होतं.”

हेही वाचा : सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत, खरी माहिती आली समोर

अभिषेक गावकर अन् सोनाली गुरवच्या कामाबद्दल

‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेतून अभिषेक गावकर घराघरात पोहचला. अभिषेकने मनोरंजन विश्वात फार कमी काळात मोठी पसंती मिळवली. त्याने २६ नोव्हेंबर २०२४ रोजी सोशल मीडिया रील स्टार सोनाली गुरवबरोबर लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

सोनाली गुरवच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती एक सोशल मीडिया रील स्टार आहे. सोशल मीडियावर ती सतत मजेशीर व्हिडीओ बनवत असते. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बहुतेक व्हिडीओमध्ये ती भांडखोर गर्लफ्रेंडप्रमाणे दिसली आहे. आता लग्नानंतर ती सध्या पती अभिषेक गावकरबरोबर सुंदर आयुष्य जगत आहे.

Story img Loader