मराठी मालिका अगदी प्रेक्षक आवडीने बघतात. आज टीव्हीवर प्रत्येक वाहिनीवर वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका सुरु आहेत. मालिका विश्वात डोकावले असता सुरवातीला मालिका या कौटुंबिक मालिकांच्याबरोबरीने ऐतिहासिक, पौराणिक कथांच्या आधारावर मालिका सुरु आहेत. सोनी वाहिनीने नुकतीच एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे ही मालिका धार्मिक असून आई एकविरा देवीवर बेतलेली असल्याचे प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहेत.
सोनी वाहिनीने प्रदर्शित केलेल्या या प्रोमोमध्ये एक मुलगा दोन मुली गाडीतून जात असताना गप्पा मारत असतात. अचानक समोर एक बाई दिसल्याने चालक गाडी थांबवतो. सुरवातीला ही बाई सामान्य वाटेत मात्र ती एकविरा आई दाखवण्यात आली आहे. अभिनेत्री मयूरी वाघ पहिल्यांदाच आई एकविरेच्या भूमिकेत दिसत आहे. तर ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मालिकेने घराघरात पोहचलेली अभिनेत्री अमृता पवार या मालिकेत मुख्य भूमिकेत असणार असे प्रोमो दिसत आहे.
“मला सेक्स कॉमेडी करण्यात…” चित्रपटांमध्ये काम करण्याबाबत अभिनेत्री राधिका आपटेचा खुलासा
महाराष्ट्रात आज अनेक देवस्थाने आहेत. यात कार्ल्याची एकविरा आई या देवस्थानचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा जवळील परिसरात कार्ला गडावर एकविरा आईचे मंदिर आहे. एकविरा आईचे दर्शन घेण्यासाठी लाखो भक्तगण येत असतात. सर्वात प्रसिद्ध असं हे देवीचं जागृत देवस्थान मानलं जातं. आई एकविरा कुणबी समाजाची कुलदेवता आहे. आई एकविरा रेणुका मातेचा अवतार असल्याचेदेखील म्हंटले जाते. या देवीची पूजा करण्यासाठी प्रामुख्याने आगरी कोळी समाजाचे बांधव येत असतात. या मंदिराच्य बाजूलाच प्रसिद्ध बौद्धकालीन लेण्या आहेत.
संकटातून भक्तांना तारण्यासाठी येत आहे एकविरा आहे! असा कॅप्शन दिला आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एकविरा आईच्या भक्तांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आईचे भक्तदेखील आता मालिकेची आतुरतेने वाट बघत आहेत.