सध्या नव्या विषयांवर आधारित नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच लोकप्रिय मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे. त्यापैकी एक म्हणजे ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ ही लोकप्रिय मालिका. या मालिकेचा काल (१९ ऑगस्ट) शेवटचा भाग प्रसारित झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “…याचं शल्य मनात नक्कीच आहे”; केदार शिंदेंच्या ‘त्या’ पोस्टनं वेधलं लक्ष, म्हणाले, “सैराट….”

‘ज्ञानेश्वर माउली’, ‘गाथा नवनाथांची’ अशा भक्तिपर मालिकांच्या यशानंतर ‘सोनी मराठी’वर २८ नोव्हेंबर २०२२ पासून ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ ही मालिका सुरू झाली होती. एकवीरा देवीचा महिमा सांगणारी ही मालिका अल्पावधीच घराघरात पोहोचली. या मालिकेत अभिनेत्री मयूरी वाघ आणि अमृता पवार या मुख्य भूमिकेत होत्या. मयूरीनं एकवीरा आईची भूमिका साकारली होती, तर अमृतानं तानियाची भूमिका साकारली होती. या दोघींच्या भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्या पसंतीस उतरल्या होत्या. पण आता मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

हेही वाचा – “…म्हणून मी आनंद दिघेंची भूमिका साकारली नाही”; मंगेश देसाईंनी कारण केलं स्पष्ट, म्हणाले…

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे आणि पृथ्वीक प्रतापचं ‘हे’ खास नातं माहितेय? जाणून घ्या

‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ मालिकेचा काल शेवटचा भाग प्रसारित झाला. त्यानिमित्तानं ‘सोनी मराठी’च्या सोशल मीडिया पेजवरून मालिकेवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांचे आभार व्यक्त करण्यात आले. पण याच पोस्टच्या खाली नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका नेटकरीनं लिहिलं आहे की, “मालिका खूप लवकर संपली. अजून चालली असती तर आवडलं असतं.” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं की, “माझी आवडती मालिका होती. पण लवकर संपली. फार दुःख होतं आहे. अजून कथा बाकी होती.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, “खूपच लवकर मालिका संपली. पुढे मालिका चालायला पाहिजे होती.”

हेही वाचा – “…स्टार किड्स वगैरे काही नसतं”; प्रिया बेर्डेंनी सांगितला इंडस्ट्रीतला धक्कादायक अनुभव, म्हणाल्या, “अभिनयला…”

दरम्यान, या मालिकेत मयूरी आणि अमृता व्यतिरिक्त निषाद भोईर, अभिनय सावंत, सविता मालपेकर, मिलिंद सफई, धनंजय वाबळे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sony marathi ashirwad tuza ekvira aai serial off air pps
First published on: 20-08-2023 at 14:14 IST