‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने आजवर प्रेक्षकांना खळखळून हसवलं. क्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यात हा कार्यक्रम अगदी यशस्वी ठरला. दरम्यान जानेवारी महिन्यात या कार्यक्रमात काम करणाऱ्या कलाकारांची एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. सोनी मराठी वाहिनीवर ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ ही मालिका ५ जानेवारीपासू सुरू झाली. आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ या मालिकेमध्ये समीर चौघुले, दत्तू मोरे, वनिता खरात, शिवाली परब, प्रभाकर मोरे यांसारखे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहेत. शिवाय प्राजक्ता माळीचीही मालिकेमध्ये एण्ट्री झाली. शिवाय अभिनेते मकरंद अनासपुरे यांची या मालिकेमध्ये मुख्य भूमिका आहे. आता ही मालिका संपणार आहे. मालिकेमध्ये काम करणाऱ्या कलाकारांनी मालिकेचं चित्रीकरण संपल्यानंतर पार्टी केली.
वनिता खरात, रसिका वेंगुर्लेकर, पृथ्विक प्रताप यांसारख्या कलाकारांनी मालिकेचं संपूर्ण चित्रीकरण संपल्यानंतर एकत्र आले. या कलाकारांसाठी wrap up party ठेवण्यात आली होती. यादरम्यानचे फोटो वनितानेही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. मालिकेतील कलाकारांनी एकत्र येऊन बरीच धमाल-मस्ती केली.
गेले दोन महिने ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ ही मालिका प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ प्रमाणेच या मालिकेलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पण अगदी कमी काळ ही मालिका प्रेक्षकांना पाहता आली. मकरंद यांची तर एक वेगळीच बाजू या मालिकेच्यामाध्यमातून प्रेक्षकांच्या समोर आली.