छोट्या पडद्यावर नव्या मालिकांचा हंगाम सुरू आहे. वाहिन्या नवनवीन मालिकांची घोषणा करत आहे. त्यामुळे आता जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसत आहेत. पण यात काही मालिका वर्षही पूर्ण न होता ऑफ एअर होतं आहेत. आता या नव्या मालिकांच्या हंगामामुळे एक लोकप्रिय मालिका नऊ महिन्यातच गाशा गुंडाळणार असल्याची सुत्रांकडून माहिती मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Video: “बोटिंग, जंगल सफारी अन्…”, मुग्धा वैशंपायनने लग्नानंतरचा पहिला वाढदिवस ‘असा’ केला होता साजरा, प्रथमेशने दिलेलं खास सरप्राइज

२१ ऑगस्ट २०२३ पासून ‘सोनी मराठी’ वाहिनीवर सुरू झालेली ‘राणी मी होणार’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अभिनेता सिद्धार्थ खिरीड व अभिनेत्री संचिता कुलकर्णी यांची प्रमुख असलेली ‘राणी मी होणार’ ही मालिका अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. मल्हार व मीराच्या जोडीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. पण आता मालिका लवकरच प्रेक्षकांचा बंद होणार असल्याचं समोर आलं आहे. ‘राणी मी होणार’ मालिकेचा ८ जूनला शेवटचा भाग प्रसारित होणार असल्याची माहिती मिळत आहे. पण अद्याप वाहिनीकडून अधिकृत घोषणा झालेली नाही.

दरम्यान, ‘राणी मी होणार’ मालिकेत सिद्धार्थ खिरीड व संचिता कुलकर्णी व्यतिरिक्त अभिनेत्री पूर्णिमा तळवळकर, स्वाती देवल, संजय कुलकर्णी, उषा नाईक असे अनेक कलाकार काम करत आहेत.

हेही वाचा – ‘लागिर झालं जी’मधील आणखी एक अभिनेता झळकणार अज्याच्या ‘लाखात एक आमचा दादा’ नव्या मालिकेत, पोस्ट करत म्हणाला, “नवी सुरुवात…”

हेही वाचा – रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड म्हणणाऱ्याला गौरव मोरेचं सडेतोड उत्तर, म्हणाला, “हिंमत असेल तर…”

सोनी मराठी वाहिनी’वर सुरू होणाऱ्या नवीन मालिका

काही दिवसांपूर्वी ‘सोनी मराठी’ वाहिनीवर ‘जय जय शनिदेव’ मालिका सुरू झाली. त्यानंतर आता १० जूनपासून ‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेत्री श्रृती मराठेची निर्मिती असलेल्या या मालिकेत अभिनेत्री अनुष्का बोऱ्हाडे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. याशिवाय अभिनेता सुबोध भावे व अभिनेत्री शिवानी सोनारची प्रमुख भूमिका असलेली ‘तू भेटशी नव्याने’ ही नवी मालिका देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sony marathi serial rani mi honar will off air pps