Marathi Actor Sourabh Chougule Post : ‘मुफासा : द लायन किंग’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या डब्ड व्हर्जनमध्ये शाहरुख खान, त्याचा मोठा मुलगा आर्यन खान आणि लहान मुलगा अबराम यांनी आवाज दिला आहे. हे तिघंही एकत्र काम करत असल्याने चाहत्यांची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचली आहे. पण, याचबरोबर या ‘मुफासा : द लायन किंग’ प्रोजेक्टच्या डब्डसाठी काही दिग्गज मराठी कलाकार सुद्धा जोडले गेले आहेत.
२०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द लायन किंग’ या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर ‘मुफासा : द लायन किंग’ हा चित्रपटाचा पुढील भाग येत्या २० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख खान ‘मुफासा’, आर्यन ‘सिंबा’, तर अबराम ‘लहान मुफासा’ला आवाज देणार आहेत. हा चित्रपट लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी पर्वणी ठरेल असा विश्वास किंग खानला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र या चित्रपटाचे पोस्टर्स झळकत आहेत.
सौरभ चौघुलेची पोस्ट
मराठी अभिनेत्याने नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत सोशल मीडियावर एक संतप्त सवाल उपस्थित केला आहे. शाहरुख आणि त्याच्या दोन मुलांसह मकरंद देशपांडे, संजय मिश्रा, श्रेयस तळपदे हे तीन नामांकित अभिनेते सुद्धा या चित्रपटासाठी काम करणार आहेत. यासंदर्भात अभिनेता सौरभ चौघुलेने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत सवाल उपस्थित केला आहे. नामांकित कलाकार चित्रपटासाठी डबिंग करणार असल्याने या पोस्टरवर सगळ्या कलाकारांची नावं एकत्रितपणे झळकणं अपेक्षित होतं. पण, फिल्म इंडस्ट्रीत तुलनेने फारसं योगदान नसलेल्या किंग खानच्या मुलांची नावं पोस्टरवर ठळक अक्षरात पाहून सौरभने काय मत मांडलंय जाणून घेऊयात…
“शाहरुख खान समजू शकतो पण, आर्यन खान आणि अबराम खान यांचं नाव बोल्डमध्ये का? बाकी दिग्गज मकरंद देशपांडे, संजय मिश्रा, श्रेयस तळपदे यांचं नाव असं सेकंडरी लिहायचं हे किती चुकिचं आहे? नक्कीच या सगळ्यांचं फिल्म इंडस्ट्रीसाठीचं योगदान अबराम खान आणि आर्यन खान यांच्यापेक्षा जास्तच आहे…” असं स्पष्ट मत सौरभ चौघुलेने ( Sourabh Chougule ) याद्वारे मांडलं आहे.
दरम्यान, ‘मुफासा : द लायन किंग’ या वर्षाच्या अखेरीस २० डिसेंबर २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, सौरभने ( Sourabh Chougule ) शेअर केलेली पोस्ट त्याची पत्नी योगिताने देखील रिशेअर केली आहे.