आघाडीची दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आज लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. तिचे फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. भारतात तसेच भारताबाहेर तिचे करोडो चाहते आहेत. तर ‘पुष्पा’ चित्रपटातील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं. तर आता लवकरच तिचा मराठमोळा अंदाज समोर येणार आहे.

‘झी चित्र गौरव पुरस्कार’मध्ये ती सहभागी होणार आहे. इतकंच नाही तर या कार्यक्रमामध्ये ती लावणीही सादर करणार आहे. कार्यक्रमातील तिचे काही प्रोमोसुद्धा सोशल मीडियावर खूपच चर्चेत आले आहेत. आता नुकत्याच आउट झालेल्या प्रोमोमध्ये ती चक्क मराठीत बोलताना दिसली.

आणखी वाचा : ‘अशी’ झाली रश्मिका मंदानाला मराठी गाण्यांची ओळख; खुलासा करत म्हणाली, “लहानपणी मी…”

‘झी चित्र गौरव पुरस्कार’मधील रश्मिका मंदाना आणि श्रेयस तळपदे यांचा एक नवा प्रोमो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये श्रेयस कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असलेला दिसत आहे. तर रश्मिका सादरीकरण करण्यासाठी स्टेजवर आलेली पाहायला मिळत आहे. तर रश्मिकाला पाहून श्रेयस फिदा झालेला दिसला. तू त्याच्या एक्सप्रेशन्सने रश्मिकाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असलेला दिसला. यावेळी श्रेयसने पुष्पा चित्रपटातील त्याचा प्रसिद्ध डायलॉगही म्हणून दाखवला. तर या प्रोमोच्या शेवटी रश्मिका मराठीत बोलली. ती म्हणाली, “नाद खुळा.”

हेही वाचा : “मी पहिल्यांदा शॉर्ट्स घातली आणि…” ऐश्वर्या नारकर यांनी रंगलेल्या चर्चंबाबत केलं भाष्य

आता तिचा हा व्हिडीओ सध्या चाहत्यांमध्ये खूपच चर्चेचा विषय ठरत आहे. तर यावर कमेंट करत तिचा मराठमोळा अंदाज आवडल्याचंही प्रेक्षक सांगत आहेत.

Story img Loader