अभिनेत्री स्पृहा जोशीने नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. छोट्या पडद्यांवरील मालिकांमुळे स्पृहा घराघरांत पोहोचली आणि महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री झाली. नुकतीच ती सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी स्पृहाने तिच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितले.
हेही वाचा : “आताचे अभिनेते अंगावरचे केस…”, बॉलीवूडमधील बदलांविषयी सनी देओलने मांडले स्पष्ट मत; म्हणाला…
अभिनय क्षेत्रातील करिअरसाठी नवऱ्याने कशी साथ दिली याविषयी सांगताना अभिनेत्री म्हणाली, “आमच्या दोघांची कॉलेजमध्ये असताना ओळख झाली होती. त्यानंतर बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यावर २०१४ मध्ये आम्ही लग्न केले. अभिनय क्षेत्रात सलग १४ ते १५ तास काम करावे लागते. यासाठी माझ्या नवऱ्याने मला प्रचंड सहकार्य केले. ‘अग्निहोत्र’ मालिकेच्या सेटवर तो खास सुट्ट्या घेऊन मला भेटायला यायाचा.’
स्पृहा पुढे म्हणाली, “मी सुरुवातीला वरदला जेव्हा माझ्या अभिनय क्षेत्रातील करिअरचा निर्णय सांगितला तेव्हा तो जरा गडबडला. कारण, अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या मुलीशी त्याला लग्न करायचे नव्हते. लग्नासाठी त्याने नॉर्मल क्षेत्रातील मुलीचा विचार केला होता. मी सुरुवातीला UPSC करत होते म्हणून आम्ही डेट करायला सुरुवात केली. मी अभिनय करणार नाही असे मी त्याला सांगितले होते. कारण, मलाही युपीएससीची तयारी करायची होती. पण, त्यानंतर माझ्या मनातील विचार बदलला.”
हेही वाचा : “तुझा अभिमान…”, अभिज्ञा भावेने ‘व्हॉट झुमका’ गाण्यावर केला भन्नाट डान्स, क्षिती जोगचे कौतुक करत म्हणाली…
“बाबांना मी अभिनय क्षेत्रात करिअरचा निर्णय सांगितल्यावर वरदला सुद्धा मी याबाबत सांगितले. त्याने मला शांतपणे माझे मत विचारले आणि आम्ही खूप गांभीर्याने या सगळ्या विषयावर एकमेकांशी चर्चा केली. त्यानंतर त्याने माझा निर्णय मान्य केला. या सगळ्याचे श्रेय त्याला देणे खूप जास्त महत्त्वाचे आहे. लग्नानंतर आजही तो मला समजून घेतो.” असे स्पृहाने सांगितले.