सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येण्याच सत्र सुरू आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. गेल्या काही महिन्यांपासून जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेऊन नवीन मालिका येत आहेत. मग ‘झी मराठी’ वाहिनी असो किंवा ‘स्टार प्रवाह’ प्रत्येक मराठी वाहिनी नवीन मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनसाठी घेऊन येत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘कलर्स मराठी’ने ‘इंद्रायणी’ या मालिकेची घोषणा केली होती. त्यानंतर आता आणखी एका नव्या मालिकेची घोषणा ‘कलर्स मराठी’ने केली आहे. या मालिकेत सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री स्पृहा जोशी पाहायला मिळणार आहे.
‘कलर्स मराठी’ने नुकतंच सोशल मीडियावर नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित केला आहे. या नवीन मालिकेचं नाव ‘सुख कळले’ असं आहे. या मालिकेत अभिनेत्री स्पृहा जोशीसह अभिनेता सागर देशमुख झळकणार आहे. याशिवाय स्पृहा व सागरबरोबर मिमी खडसे ही बालकलाकार देखील पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा – “खानदेशी झाली बो…”, ‘ताली’ फेम वहिनीने खानदेशी जेवण बनवल्यावर अमृता देशमुखची पोस्ट, म्हणाली…
स्पृहा व सागर यांची प्रमुख भूमिका असलेली ‘सुख कळले’ ही नवीन मालिका कधीपासून सुरू होणार? हे गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. पण मालिकेचा सुंदर प्रोमो पाहून कलाकार मंडळींसह स्पृहाच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. या प्रोमोवर इतर कलाकार मंडळी शुभेच्छा देत असून चाहत्यांनी उत्साही असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा – “मला अतिशय अभिमान…”, मधुरा वेलणकरने सासरे शिवाजी साटम यांचं केलं कौतुक, म्हणाली, “२३ वर्ष CID…”
दरम्यान, याआधी स्पृहा ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लोकमान्य’ या मालिकेत झळकली होती. या मालिकेत तिने लोकमान्य टिळकांची पत्नी सत्यभामाबाई यांची भूमिका साकारली होती. तर सागर देशमुख ‘झी मराठी’वरील ‘चंद्रविलास’ या मालिकेत पाहायला मिळाला होता. या मालिकेत सागर आनंद महाजन या भूमिकेत दिसला होता. पण स्पृहा व सागर यांची ‘लोकमान्य’ व ‘चंद्रविलास’ या दोन्ही मालिका टीआरपीच्या कारणास्तव काही महिन्यातच ऑफ एअर झाल्या होत्या.