सध्या नव्या मालिकेचं हंगाम सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री स्पृहा जोशी व सागर देशमुखच्या नव्या मालिकेची घोषणा झाली. ‘सुख कळले’ असं या नव्या मालिकेचं नाव आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर ही नवी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेचा नवीन प्रोमो प्रदर्शित झाला आहे.
‘कलर्स मराठी’च्या इन्स्टाग्राम पेजवर ‘सुख कळले’ या मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये स्पृहा, सागरसह इतर कलाकार झळकले आहेत. महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर व अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहमच्या ‘सोहम प्रोडक्शन हाऊस’ची ही नवी मालिका आहे.
हेही वाचा – Video: रणबीर कपूर-आलिया भट्टने लेक राहासह साजरी केली होळी, व्हिडीओ आला समोर
स्पृहा व सागरच्या ‘सुख कळले’ या नव्या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले, बालकलाकार मिमी खडसेसह बरेच कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत. २२ एप्रिलपासून ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण मालिकेची वेळ अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, नुकतीच ‘कलर्स मराठी’वरील ‘सिंधुताई माझी माई’ ही मालिका ऑफ एअर झाली. या मालिकेची जागा ‘इंद्रायणी’ या नव्या मालिकेने घेतली. त्यामुळे आता स्पृहा जोशी व सागर देशमुखची नवीन मालिका कोणत्या जुन्या मालिकेची जागा घेणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
हेही वाचा – ऐश्वर्या व अविनाश नारकरांचा मुलगा आहे खूप हँडसम, जाणून घ्या अमेय नारकरबद्दल
स्पृहा व सागरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, याआधी स्पृहा ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लोकमान्य’ या मालिकेत झळकली होती. या मालिकेत तिने लोकमान्य टिळकांची पत्नी सत्यभामाबाई यांची भूमिका साकारली होती. तर सागर देशमुख ‘झी मराठी’वरील ‘चंद्रविलास’ या मालिकेत पाहायला मिळाला होता. या मालिकेत सागर आनंद महाजन या भूमिकेत दिसला होता.