स्पृहा जोशी हे नाव नेहमीच मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत सामील आहे. उत्तम अभिनेत्री आणि संवेदनशील कवयित्री, उत्कृष्ट सूत्रसंचालिका म्हणून तिला ओळखलं जातं. स्पृहाने आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. यामुळे घराघरात तिला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. गेले काही दिवस ती तिच्या ‘लोकमान्य’ या मालिकेमुळे चर्चेत आहे. आता नुकतंच तिने या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात केल्याचं सांगितलं आहे.
लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित ‘लोकमान्य’ ही मालिका गेल्या महिन्यात सुरू झाली. आतापर्यंत या मालिकेत लोकमान्य टिळक किशोरवयीन असताना त्यांचं आयुष्य कसं होतं हे दाखवण्यात आलं. तर आता लवकरच ही मालिका काही वर्ष पुढे जाणार असून लोकमान्य टिळकांच्या भूमिकेत क्षितिज दाते तर त्यांची पत्नी सत्यभामाबाई यांच्या भूमिकेत स्पृहा जोशीची एन्ट्री होणार आहे.
आणखी वाचा : Shark Tank India 2: प्रसिद्ध लेखकाकडून नमिता थापरची अनन्या पांडेशी तुलना, म्हणाला, “तिचे वडील…”
आज तिने या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. तिने इन्स्टाग्रामवर विशाल पाटील याची एक स्टोरी शेअर करत ही बातमी चाहत्यांना सांगितली. यामध्ये ‘लोकमान्य’ मालिकेच्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने लिहिलं, “नवीन सुरुवात…बाप्पा मोरया!”

हेही वाचा : “अभिनेत्री होण्यासाठीचे गुण माझ्यात नाहीत…” स्पृहा जोशीच्या पोस्टने वेधलं लक्ष
घड्याळ्याच्या काट्याला बांधून दिवसरात्र धावणाऱ्या, भूतकाळाचे ओझे भिरकावून देत काळासोबत चालणाऱ्या लोकमान्य टिळकांचा असामान्य प्रवास अचंबित करणारा आहे. तो मालिकेतून पाहणं प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा ठरेल. ह्या मालिकेचं लेखन केलं आहे आशुतोष परांडकर यांनी तर स्वप्निल वारके हे दिग्दर्शक आहेत. दशमी क्रिएशन्स हे या मालिकेचे निर्मिते आहेत.