Spruha Joshi Sukh Kalale Serial Off Air : छोट्या पडद्यावरील वाहिन्यांमध्ये सध्या टीआरपीसाठी मोठी चढाओढ असल्याचं पाहायला मिळत आहे. दमदार कथानक, नव्या कलाकारांची एन्ट्री, रंजक वळण या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित करतात. आता येत्या काळात विविध वाहिन्यांवर नवनवीन मालिका सुरू होणार आहेत. या सगळ्या नव्या मालिकांबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, काही जुन्या मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत.

अभिनेत्री स्पृहा जोशीची ( Spruha Joshi ) प्रमुख भूमिका असलेली ‘सुख कळले’ मालिका २२ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ही मालिका कलर्स मराठीवर प्रसारित करण्यात येते. मात्र, आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे. स्पृहा जोशीने सेटवरचे व्हिडीओ, फोटो व पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. अभिनेत्रीच्या कॅप्शनवरून मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं स्पष्ट होत आहे. ही मालिका सुरू होऊन आता जवळपास फक्त ५ महिने पूर्ण होतील.

tharla tar mag monika dabade baby shower ceremony
‘ठरलं तर मग’च्या सेटवर मोनिकाचं डोहाळेजेवण; मालिकेतील सर्व अभिनेत्री ऑफस्क्रीन आल्या एकत्र, पती उखाणा घेत म्हणाला…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Titeeksha Tawade
Video : ‘लव्हयापा’ म्हणत तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ; एकता व ऐश्वर्या नारकरांनी दिली साथ, पाहा व्हिडीओ
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार
Novel sports Competition Rita Bullwinkle
रेंगाळत ठेवणारी मनलढाई…
Marathi Actress Nupur Chitale
मालिकांमधून ब्रेक, ५ वर्षांसाठी गाठली दिल्ली अन्…; ‘रात्रीस खेळ चाले’मधली देविका आठवतेय का? अभिनेत्री सध्या काय करते?
ananya pandey marriage plans
अनन्या पांडे ‘या’ व्यक्तीला करतेय डेट? अभिनेत्री लग्नाचे प्लॅन्स शेअर करत म्हणाली, “पुढील पाच वर्षांत…”
Punha Kartvya Aahe
‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत होणार नवीन एन्ट्री; ‘या’ जेष्ठ अभिनेत्री दिसणार गुरूमाँच्या भूमिकेत

हेही वाचा : Video : तीन वर्षांपूर्वी नौदल अधिकाऱ्याशी बांधली लग्नगाठ, अभिनेत्री ३७ व्या वर्षी होणार आई, व्हिडीओ शेअर करून दिली Good News

स्पृहाने शेअर केली खास पोस्ट

स्पृहा लिहिते, “काही प्रवास लहान असतात…पण, निरोप घेणं तेवढंच कठीण जातं. तुम्हा सर्वांबरोबर काम करून खूपच मजा आली…सर्वांबरोबर छान वेळ घालवला. सर्वांचे धन्यवाद आणि दिलेल्या संधीबद्दल मी कायम कृतज्ञ असेन”

spruha
स्पृहा जोशीची ‘सुख कळले’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप ( Spruha Joshi )

हेही वाचा : Bigg Boss Marathi: वैभव झाला Eliminate; जान्हवी-अरबाजला अश्रू अनावर, जाताना दोघांनाही दिली खास पॉवर, जाणून घ्या…

हेही वाचा : “प्रिय आदेश भावोजी…”, पोस्टमन काकांनी वाचलं खास पत्र! सगळेच झाले भावुक; ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाने २० वर्षांनंतर घेतला निरोप

दरम्यान, ‘सुख कळले’ या मालिकेत अभिनेत्री स्पृहा जोशी ( Spruha Joshi ) व सागर देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यामध्ये कालांतराने आशय कुलकर्णीने एन्ट्री घेतली. महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर व अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहमच्या ‘सोहम प्रोडक्शन हाऊस’ची ही मालिका होती. आता या मालिकेचा शेवटचा भाग केव्हा प्रसारित होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. याशिवाय स्पृहाबद्दल सांगायचं झालं, तर ‘उंच माझा झोका’, ‘अग्निहोत्र’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकांमुळे स्पृहा जोशी घराघरांत लोकप्रिय झाली. चित्रपट, नाटक, मालिका, वेब सीरिज अशा चारही माध्यमांमध्ये तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अभिनयाप्रमाणेच स्पृहा तिच्या कवितांमुळे देखील चर्चेत असते.

Story img Loader