स्पृहा जोशी हे नाव नेहमीच मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत सामील असतं. उत्तम अभिनेत्री आणि संवेदनशील कवयित्री, उत्कृष्ट सूत्रसंचालिका म्हणून तिला ओळखलं जातं. स्पृहाने आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. यामुळे घराघरात तिला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. सध्या ती तिच्या ‘लोकमान्य’ या मालिकेमुळे चर्चेत आहे. आता अशातच तिने केलेल्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अभिनय क्षेत्रात येताना तिला आलेला अनुभव तिने शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तिने तिचे ‘लहानपण देगा देवा’ या नाटकादरम्यानचे काही जुने फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पोस्ट करताना तिने लिहिलं, “अनुभवाने तुमची निवड बदलू शकते….अभिनेत्री होणं हे माझं स्वप्न कधीही नव्हतं. अभिनयाकडे मी फक्त आवड, छंद म्हणून बघायचे. यात करिअर करण्याचा माझा कधीही विचार नव्हता. ‘अग्निहोत्र’ मालिकेत काम करत असताना मी दोनहून अधिक वर्ष यूपीएससी परिक्षेची तयारी करत होते.”

आणखी वाचा : Video: “नाही, मी तर…” शाहरुखला ‘तृतीयपंथी’ म्हणणाऱ्याला किंग खानचं सडेतोड उत्तर

हेही वाचा : “हे माझे क्रश…”; स्पृहा जोशीने पोस्ट केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

पुढे ती म्हणाली, “अभिनेत्री होण्यासाठीचे गुण माझ्यात नाहीत अशी भीती मला होती. त्यामुळे अभिनयाकडे करिअर म्हणून बघताना मी साशंक होते. पण नंतर मला सुनिल बर्वे यांच्या प्रोडक्शनचं मंगेश कदम दिग्दर्शित ‘लहानपण देगा देवा’ या नाटकात शरद पोंक्षे आणि अनेक दिग्गजांबरोबर करत करण्याची संधी मिळाली. हे माझं पहिलं व्यवसायिक नाटक होतं आणि तेव्हा मला जाणवलं की अभिनयातून मला जितका आनंद मिळतो तितका आनंद मला दुसरी कुठलीही गोष्ट देऊ शकत नाही आणि मी अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला… तुमचं नशीब तुम्हाला योग्य स्थानी नेत तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतं.” आता तिच्या या पोस्टवर तिचे चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spruha joshi wrote a post a out her past experiences rnv