Star Pravah Aai Kuthe Kay Karte Serial : ‘आई कुठे काय करते’ ही मालिका गेली पाच वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना जवळचं वाटतं. यामध्ये आई अरुंधतीची प्रमुख भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने साकारली आहे तर, यामध्ये वडिलांची भूमिका अभिनेते मिलिंद गवळी यांनी साकारली आहे. नकारात्मक भूमिका असूनही अनिरुद्ध या पात्राचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अभिनेते सोशल मीडियावर सुद्धा कायम सक्रिय असतात.

आता येत्या आठवड्यात ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकतंच या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग पार पडलं. ‘आई कुठे काय करते’ मालिकेचं देशमुख कुटुंब समृद्धी निवासमध्ये वास्तव्याला होतं. त्यामुळे या ‘समृद्धी’ बंगला या मालिकेसाठी खूप महत्त्वाचा होता. आता या बंगल्याच्या जागी नव्या मालिकेचा सेट उभारला जाईल. त्यामुळे या ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटबद्दल भावुक पोस्ट शेअर करत मिलिंद गवळींनी भावना व्यक्त केल्या आहेत.

Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Shruti Haasan With Parents
“लोक माझ्याकडे बोट दाखवायचे अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्री घटस्फोटित आई-वडिलांना म्हणाली ‘हट्टी’
Marathi actress Vishakha Subhedar statement talking about divorce
“लग्नसंस्था आता आपण समाजानेचं मोडीत काढल्यात…”, घटस्फोटाबाबत बोलताना विशाखा सुभेदारचं वक्तव्य, म्हणाली…
Milind Gawali
“या पाच वर्षांत…”, ‘आई कुठे काय करते’मधील भूमिकेबद्दल मिलिंद गवळींचे मोठे वक्तव्य; म्हणाले, “अनिरुद्धला…”
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
Vikrant Massey Family Live in Godown
“घरातून बाहेर काढलं, वर्षभर गोदामात राहिलो…”; बॉलीवूड अभिनेत्याने सांगितल्या कठीण काळातील आठवणी

हेही वाचा : अरुंधती अनिरुद्धला घराबाहेर काढणार अन् तोंडावर…! ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या अंतिम भागात काय घडणार? पाहा जबरदस्त प्रोमो

‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटबद्दल मिलिंद गवळींची पोस्ट

१९ नोव्हेंबर २०२४ ‘आई कुठे काय करते’चं रात्री खूप उशिरा शूटिंग संपलं. २० तारखेला मतदान आणि २१ तारखेला ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ चं ‘आई कुठे काय करते’च्या सहकलाकारांबरोबर शूटिंग होतं. म्हणून मग २२ तारखेला, म्हणजेच काल माझ्या मेकअप रूम मध्ये माझं राहिलेलं काही सामान घेण्यासाठी मी शेवटचं समृद्धी बंगल्यामध्ये गेलो.

बंगल्याचा सेटिंगचा जो भाग होता त्याचं तोडायचं काम चालू होतं. मला आमचा समृद्धी बंगला आधी ओळखूच नाही आला, हिच का ती वास्तु जिथे आम्ही पाच वर्ष स्वतःचं घर समजून बिनधास्त वावरत होतो. गावाकडे यात्रा संपली की जसा तंबू , प्रोजेक्टर गुंडाळून ट्रकमध्ये टाकून दुसऱ्या गावी घेऊन जायचे, तसंच हा समृद्धी बंगल्याचा सेट पाडून, नवीन मालिकेचा सेट तिथे उभा करणार आहेत बहुतेक.

आज त्या बंगल्याकडे बघताना खूप वाईट वाटलं, DKP चे राजनशाही सर आणि स्टार प्रवाह यांनी मिळून किती सुंदर समृद्धी बंगला बांधला होता. अगदी पाच वर्ष खरोखर एक सुंदर घर वाटत होतं. त्यातली माणसं खरी-खरी वाटत होती आणि आज काही क्षणातच त्यातली सगळी माणसं आपापल्या गावी निघून गेली. एका क्षणात ते घर नव्हतं तर तो एक सेट होता हे प्रकर्षाने जाणवलं.

यालाच जीवन ऐसे नाव म्हटलं जातं बहुतेक, आपल्या संस्कृतीमध्ये सुंदर-सुंदर गणपतीच्या मुर्त्या बनवल्या जातात, रोज तिची आराधना पूजा केली जाते आणि काही दिवसांनी ती सुंदर मूर्ती पाण्यामध्ये विसर्जन केली जाते. तसंच काहीसं सिनेमांचं आणि मालिकांचं होत असावं. खरंतर, हे मला खूप वर्षांपूर्वी जाणवलं होतं, this is an imaginary world, illusionary world, एका लेखकाच्या कल्पनेत एक कुटुंब येतं, एक कथा येते, त्या कुटुंबाला शोभणारं घर, आर्ट डायरेक्टर तयार करतो. राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून अनेक वस्तू गोळा करून त्या घरामध्ये आणतो. स्वयंपाक घर, देवघर, हॉल, बेडरूम, कोणाला विश्वास बसणार नाही पण या समृद्धी बंगल्यामध्ये ४० लोकेशन तयार केली गेली होती. अक्षरशः कोर्टरूम पण, पोलीस स्टेशन, सगळे ऑफिसेस, आश्रम, हॉस्पिटल्स, ९० टक्के शूटिंग आम्ही या बंगल्यातच केलं. फक्त गाडीतले आणि रस्त्यावरचे काही सीन्स समृद्धी बंगल्याच्या बाहेर करत होतो. ते पण दोन-चार किलोमीटरच्या परिसरात, तीन वेळा फक्त फिल्मसिटीला डीकेपीच्या ‘अनुपमा’च्या सेटवर आम्ही जाऊन शूटिंग केलं होतं. समृद्धीच्या सेटवरचं तुळशी वृंदावन पण dismantle केलं, पण मी मात्र त्यातलं तुळशीचं रोप माझ्यासाठी राखून ठेवलं, ते मला हवंय असं सांगितल्यावर कोणीही नाही म्हणालं नाही. समृद्धी बंगल्यातल्या असंख्य आठवणी आणि अंगणातली तुळस घेऊन बाहेर पडलोय. Samurdhi

हेही वाचा : “लगे रहो नवरोबा…”, विशाखा सुभेदारचे पती मालिकाविश्वात करणार पुनरागमन! अभिनेत्री म्हणते, “तू अनेक जबाबदाऱ्या…”

मालिकेतील याच ‘समृद्धी’ बंगल्याच्या प्रवेशद्वाराजवळ तुळस तयार करण्यात आली होती. देशमुख कुटुंबीय आणि घरासमोरची तुळस याचं देखील वेगळे नातं होतं. हीच तुळस मिलिंद गवळी यापुढे आपल्या स्वगृही जपून ठेवणार आहेत.