Star Pravah New Serial : सध्या छोट्या पडद्यावरच्या मालिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक वाहिन्यांवर बिग बजेट नव्या मालिका सुरू होणार आहेत. तर, काही जुन्या मालिकांमध्ये आता नवनवीन ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहेत. ‘स्टार प्रवाह’ वाहिनी गेल्या काही वर्षांपासून टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. या वाहिनीवरील बऱ्याच मालिका टीआरपीच्या आकडेवारीत आघाडीवर असतात. यापैकीच एका मालिकेत येत्या काही दिवसांत एक मोठा ट्विस्ट येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर गेली ३ वर्षे ‘अबोली’ ही मालिका प्रक्षेपित केली जाते. यामध्ये गौरी कुलकर्णी, सचित पाटील, शर्मिष्ठा राऊत या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. रात्री उशिरा प्रसारित होऊनही ‘अबोली’ मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. आता येत्या काळात या मालिकेत दोन लोकप्रिय अभिनेत्रींची एन्ट्री होणार आहे. या दोन अभिनेत्री कोण आहेत पाहूयात…

‘अबोली’ मालिकेत ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली जान्हवी किल्लेकर महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. जान्हवी नेहमीपेक्षा वेगळी म्हणजेच एका पोलीस अधिकारी महिलेची भूमिका साकारणार आहे. तिच्या व्यक्तिरेखेचं नाव दीपशिखा भोसले असं आहे. तर, जान्हवीच्या सोबतीने आणखी एका अभिनेत्रीने या ‘अबोली’ मालिकेत एन्ट्री घेतली आहे.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना या दोघींची पाहायला मिळत आहे. जान्हवीसह या मालिकेत अभिनेत्री मयुरी वाघची एन्ट्री झालेली आहे. यापूर्वी मयुरीने ‘अस्मिता’, ‘आशीर्वाद तुझा एकविरा आई’, ‘लव्ह लग्न लोचा’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये काम केलेलं आहे.

समोर आलेल्या प्रोमोमध्ये, इन्स्पेक्टर दीपशिखा चौकशी करताना संशयिताला पट्ट्याने मारत असते. इतक्यात अबोली येऊन दीपशिखाला अडवते आणि “अंकुश सरांच्या पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करण्याची ही पद्धत नाहीये” असं तिला सांगते. यावर, “ही आता अंकुशची नव्हे तर इन्स्पेक्टर दीपशिखा भोसले पाटीलची चौकी आहे” असं उत्तर दीपशिखा देते. पुढे, अबोली म्हणते, “कोणाचीही चौकी असो, जो कायद्याने चालणार नाही त्याला अबोली वकिलीचा हिसका दाखवणार”

दरम्यान, आता जान्हवी आणि मयुरी या दोन्ही अभिनेत्री येत्या १५ जानेवारीपासून ‘अबोली’ मालिकेत झळकणार आहेत. या दोघींची एन्ट्री झाल्यावर मालिकेत कोणतं नवीन वळण येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.