‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येत्या काळात काही नवीन मालिका सुरू होणार आहेत. सध्या रेश्मा शिंदेच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेची सर्वत्र चर्चा चालू आहे. ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेला वाहिनीने संध्याकाळी ७.३० चा स्लॉट दिला आहे. या वेळेत सध्या ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रसारित केली जाते. त्यामुळे एवढे दिवस अरुंधती प्रेक्षकांचा निरोप घेणार का? अशा चर्चा रंगल्या होत्या. परंतु, ही मालिका बंद होणार नसून वाहिनीने ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या वेळेत बदल केला आहे.

‘स्टार प्रवाह’ची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. अरुंधतीने कुटुंबासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं. तिच्या वाट्याला मात्र नेहमी संघर्षच आला. अनिरुद्धकडून झालेली फसवणूक, २५ वर्षांच्या संसाराचा दुर्दैवी शेवट, घटस्फोट आणि आता आशुतोषबरोबर लग्न करुन नव्याने संसार थाटण्याचा घेतलेला निर्णय. अरुंधतीच्या आयुष्यात अनेक सुख-दु:खाचे क्षण आले. मात्र अरुंधती परिस्थितीसमोर कधीही हतबल झाली नाही. दु:ख मागे सारून ती प्रत्येक प्रसंगाशी ताठ मानेने लढली.

icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
fire toy shop Amravati, Amravati, fire toy shop,
अमरावतीत खेळणी दुकानाला भीषण आग
Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
Narendra Modi statement that Congress wants to end OBC reservation
काँग्रेसला ओबीसी आरक्षण संपवायचे -मोदी
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका

हेही वाचा : ना गाडी, ना रिक्षा…; ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीने भर गर्दीत केला मुंबईच्या लोकल ट्रेनने प्रवास; म्हणाला…

आशुतोषबरोबर नव्याने आयुष्य सुरू करुन सुखाचे क्षण अनुभवत असतानाच पुन्हा एकदा नियती अरुंधतीची परीक्षा घेणार आहे. सगळं काही सुरळीत सुरु असतानाच अचानक एका अपघातात आशुतोषचं निधन होणार आहे. अरुंधतीसाठी हा सर्वात मोठा धक्का असून या कठीण प्रसंगात अरुंधतीच्या पाठीशी आईच्या मायेने ठामपणे उभी रहाणार आहे अरुंधतीची सासू अर्थात कांचन. सध्या मालिकेच्या या नव्या ट्वि्स्टबद्दल सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : केदार शिंदे यांचा ‘आईपण भारी देवा’ लवकरच येणार, जागतिक महिला दिनानिमित्ताने घोषणा

सासू कधीच आईची जागा घेऊ शकत नाही असं म्हटलं जात. मात्र कांचनने उचललेलं पाऊल समाजातील अनेक अरुंधतींना नक्कीच नवी उभारी देईल. कांचनच्या साथीने अरुंधती या कठीण प्रसंगाचा सामना कसा करणारा याचा प्रवास ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल. या मालिकेच्या वेळेत आता बदल करण्यात आला असून ‘आई कुठे काय करते’ मालिका येत्या १८ मार्चपासून दुपारी २.३० वाजता प्रसारित केली जाणार आहे.