Star Pravah Serial Off Air : छोट्या पडद्यावर एखादी मालिका सुरू होते अन् पुढच्या काही दिवसांतच प्रेक्षकांना संबंधित मालिकेतील सगळी पात्र अगदी घरच्यासारखी वाटू लागतात. अशा मालिका जेव्हा निरोप घेतात तेव्हा प्रेक्षकांसह संबंधित मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांचंही मन भरून येतं. काही दिवसांपूर्वीच जवळपास पाच वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ‘आई कुठे काय करते’ मालिका संपली. आता अरुंधती पाठोपाठ सिंधू प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

‘स्टार प्रवाह’ ( Star Pravah ) वाहिनीवर दुपारच्या सत्रात सुरू असलेली ‘लग्नाची बेडी’ ही मालिका येत्या काही दिवसातच Off Air होणार आहे. वाहिनीने यासंदर्भात अधिकृत इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. ‘लग्नाची बेडी’ ही मालिका ३१ जानेवारी २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेने नुकताच ९०० हून अधिक भागांचा विक्रमी टप्पा सुद्धा ओलांडला. दुपारच्या वेळेत प्रसारित होऊनही या मालिकेला चांगला टीआरपी मिळत होता.

marathi actress entered in the new serial of star pravah
आधी ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकली; आता ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत एन्ट्री! ‘ती’ अभिनेत्री कोण? प्रोमो आला समोर…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
star pravah aboli serial new actress entry jahnavi killekar and mayuri wagh
‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत २ नव्या अभिनेत्रींची एन्ट्री! जान्हवी किल्लेकरचा पहिला लूक आला समोर, तर दुसरी नायिका कोण?
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
Ruhi Chaturvedi blessed with baby girl
एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार
sandeep baswana on relationship with ashlesha sawant
मराठमोळ्या अभिनेत्रीसह २२ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता; लग्नाबद्दल म्हणाला, “मी कायम माझ्या…”
Marathi Actress Nupur Chitale
मालिकांमधून ब्रेक, ५ वर्षांसाठी गाठली दिल्ली अन्…; ‘रात्रीस खेळ चाले’मधली देविका आठवतेय का? अभिनेत्री सध्या काय करते?

हेही वाचा : हळद लागली! किरण गायकवाडच्या लग्नाला पोहोचले ‘हे’ कलाकार, कोकणात पार पडणार विवाहसोहळा, पाहा Inside फोटो

सायली देवधरने व्यक्त केल्या भावना

‘लग्नाची बेडी’ ( Star Pravah ) मालिकेत राघव, सिंधू आणि मधुराणी ( मधू ) या तीन पात्रांच्या मध्यवर्ती भूमिका अनुक्रमे संकेत पाठक, सायली देवधर आणि रेवती लेले यांनी साकारल्या होत्या. या मालिकेबद्दल भावना व्यक्त करताना सायली म्हणते, “नमस्कार मी सायली देवधर… गेली तीन वर्षे तुम्ही सगळे मला सिंधू म्हणून ओळखत आहात. ‘लग्नाची बेडी’ मालिकेच्या शूटिंगचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या निमित्ताने मला आज संपूर्ण प्रवास आठवतोय. पहिल्या दिवशी आम्ही ठाण्यात या मालिकेचा प्रोमो शूट केला होता. त्यानंतर आम्ही जवळपास ३ ते ४ दिवस लग्नाचा सीक्वेन्स शूट केला होता. तो सगळा प्रवास खूप सुंदर होता. सेटवरची सगळी माणसं, सगळे कलाकार, क्रू, प्रोडक्शन हाऊस सगळंच चांगलं होतं. मला कधीच तणाव जाणावला नाही. नेहमीच सगळं सकारात्मक वातावरण असायचं. सिंधू ही माझी भूमिका पण खूप जास्त स्ट्राँग होती.”

“मालिका सुरु असताना डिलिव्हरी बॉय, वासुदेव, जोकर, कामवाली बाई, कृष्णा या सगळ्या भूमिका मी केल्या आहेत. यातलं कृष्णा पात्र खूप जास्त चॅलेंजिंग होतं. पण, हळुहळू मी त्या कॅरेक्टरमध्ये उतरले. मला अशी अनोखी भूमिका दिल्याबद्दल मी आज सर्वांचे आभार मानते. टचवूड आमच्या सेटवर कधी कोणाची भांडणंही झालेली नाहीच…मालिका संपणार असली तरीही आमची सर्वांची लग्नाची बेडी कधीच तुटणार नाही.” असं म्हणत सायलीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा : “हा अपघात राजकीय प्रचारसभेत झाला असता…”, अल्लू अर्जुनच्या अटकेवर विवेक ओबेरॉयचं स्पष्ट मत; उपस्थित केले ‘हे’ प्रश्न

दरम्यान, ‘लग्नाची बेडी’ ( Star Pravah ) या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यावर, याऐवजी दुपारी १ वाजता ‘साधी माणसं’ ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. तर सायंकाळी ७ वाजता ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader