‘स्टार प्रवाह’वरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेने काही दिवसातच प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. ही मालिका घराघरात लोकप्रिय ठरली होती. या मालिकेतील कथा आणि त्यातील कलाकार यामुळे त्याची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर त्यात मुख्य भूमिका साकारलेल्या शौनकने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या मालिकेत माऊ आणि शौनकची केमिस्ट्री चांगलीच गाजली. या मालिकेत शौनक हे पात्र अभिनेता योगेश सोहोनीने साकारले होते. काही दिवसांपूर्वी मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर त्याने याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने अनेक फोटोदेखील शेअर केले आहेत. त्याला दिलेल्या कॅप्शनमध्ये तो भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
आणखी वाचा : जगातील सर्वात सुंदर महिला आणि अभिनेत्रीचं निधन, करिश्मा कपूरशी होतं खास कनेक्शन

योगेश सोहानीची पोस्ट

“आज “मुलगी झाली हो” या मालिकेचा शेवटच्या भागा प्रदर्शित झाला, ७०० हुन अधिक भागांचा हा अविस्मरणीय प्रवास थांबला. थांबला म्हणणं खरं तर चुकीचं ठरेल, कारण जे कुठेतरी थांबलय ते कुठेतरी नव्याने सुरू होणार आहे. आज हे लिहिताना शूटिंगच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत घडलेल्या सगळ्या गोष्टी, घटना, किस्से, प्रसंग, डोळयांसमोर आले. हा प्रवास सोपा नव्हता अनेक अडचणी आल्या, अप्रिय घटना घडल्या, न पटणारी व न आवडणारी माणसे भेटली, त्यांचे स्वभाव कळले त्याचबरोबर असंख्य चांगली, प्रेमळ माणसे (कलाकार) भेटले, आणि ते आयुष्याचा एक भाग होऊन गेले. शौनक ही व्यक्तिरेखा साकारताना मला या घडलेल्या सगळ्या प्रसंगाचा, भेटलेल्या माणसांचा, त्यांच्या आलेल्या अनुभवाचा खूप फायदा झाला.

इन्स्टाग्राम इतकं ऍडव्हान्स असलं तरी शब्द मर्यादा आणि फोटो अपलोड करायला देखील मर्यादा आहेत हे दुर्दैव आहे, हे मला ३-४ तास मेहेनत करून जो Write Up लिहिला आणि तो अपलोड करायला गेलो तेव्हा कळलं……असो मार्क झुकरबर्ग जेव्हा हा प्रोब्लेम सोडवेल तेव्हा सोडवेल, पण या मार्यादेमुळेच मला सगळ्याची नावं इच्छा असूनही लिहिता येत नाहीयेत याच वाईट वाटतय.

पण मीही खूप चिवट आहे, सगळी नाव जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाहीत आणि त्यांचे आभार मानत नाही तो पर्यंत मला चैन पडणार नाही. तर माझ्या फेसबुक वरील पोस्ट मध्ये त्या सगळ्यांबद्दल लिहून आभार मानले आहेत ते जरूर वाचा, फेसबुक ची लिंक Bio मध्ये देत आहे. ते वाचून मायबाप रसिक प्रेक्षकांना कळेल की किती माणसे एखाद्या प्रोजेक्टशी निगडित असतात आणि त्याच योगदान किती महत्त्वाच असतं.

लवकरच एका वेगळ्या मालिकेत, वेगळ्या भूमिकेत भेटू तोपर्यंत पुनरागमनायच……योगेश माधव सोहोनी.”, असे त्याने यात लिहिले आहे.

आणखी वाचा : ‘मुलगी झाली हो’ घेणार प्रेक्षकांचा निरोप, ‘असा’ होणार मालिकेचा शेवट

दरम्यान ‘मुलगी झाली हो’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर आता स्टार प्रवाहवर ‘शुभविवाह’ नावाची नवी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेत बहिणीच्या स्वप्नासाठी आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्या भूमीच्या त्यागाची गोष्ट यात दाखवली जाणार आहे. सोमवारी १६ जानेवारीपासून दुपारी २ वाजता ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत मधुरा देशपांडे, यशोमन आपटे, विशाखा सुभेदार, कुंजिका काळविंट, अभिजीत श्वेतचंद्र हे कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.