‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. येत्या १८ मार्चपासून संध्याकाळी ७.३० वाजता ही मालिका प्रक्षेपित केली जाणार आहे. नुकताच या मालिकेचा भव्य लॉन्च सोहळा पुण्यात पार पडणार आहे. यावेळी या कार्यक्रमाला मालिकेचे सर्व कलाकार उपस्थित राहिले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्टार प्रवाहच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत रेश्मा शिंदे, सुमीत पुसावळे, सविता प्रभुणे, प्रमोद पवार, उदय नेने, आशुतोष पत्की, प्रतिक्षा मुणगेकर, नयना आपटे व बालकलाकार आरोही सांबरे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. रेश्मा या मालिकेत ‘जानकी’, तर सुमीत यामध्ये ‘हृषिकेश’ हे पात्र साकारणार आहे.

हेही वाचा : Video : समुद्रकिनारे, खाद्यसंस्कृती, नारळाच्या बागा अन्…; ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्री गोव्यात करतेय धमाल

पुण्यात पार पडलेल्या लॉन्च सोहळ्यात जानकी आणि हृषिकेशने एकमेकांसाठी खास उखाणे घेतले. मालिकेत हृषिकेशची भूमिका साकारणारा सुमीत पुसावळे उखाणा घेत म्हणाला, “भाजीत भाजी मेथीची जानकी माझ्या प्रितीची”, तसेच “ढेप्यांच्या वाड्यात आज बेत जमलाय घास, हृषिकेश रावांना भरवते प्रेमाचा घास” हा उखाणा जानकीने घेतला.

हेही वाचा : राजकारणात येणार का? ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने स्पष्टच सांगितलं; म्हणाली, “संधी मिळाली तर…”

दरम्यान, ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका येत्या १८ मार्चपासून संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. याशिवाय शिवानी बावकरची प्रमुख भूमिका असलेली ‘साधी माणसं’ ही मालिका सायंकाळी ७ वाजता प्रसारित केली जाईल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Star pravah new serial gharoghari matichya chuli lead actor took ukhana at launch sva 00