Star Pravah New Serial Lagnanantar Hoilach Prem : टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर राहण्यासाठी सध्या मराठी वाहिन्यांवर नव्या मालिकांची मांदियाळी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. ‘स्टार प्रवाह’ने सप्टेंबर महिन्यात मृणाल दुसानिस पुनरागमन करत असल्याचं जाहीर केलं होतं. तब्बल ४ वर्षांनी भारतात परतलेली मृणाल कोणत्या मालिकेतून पुनरागमन करणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती. अखेर या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोच्या माध्यमातून नव्या मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख अन् वेळ जाहीर करण्यात आली आहे. मृणाल दुसानिसबरोबर या मालिकेत विवेक सांगळे, ज्ञानदा रामतीर्थकर आणि विजय आंदळकर हे कलाकार झळकणार आहेत. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत हे चार कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

हेही वाचा : Video: नारकर जोडप्याचा दाक्षिणात्य गाण्यावर डान्स, लेक अन् जावयाला पाहून ऐश्वर्या यांचे वडील झाले खूश, सर्वत्र होतंय कौतुक

मालिकेच्या ( Star Pravah ) प्रोमोची सुरुवात विवेक अन् ज्ञानदाच्या गप्पांनी होते. यावेळी विवेक तिची चेष्टा करतो. यावर ज्ञानदा म्हणते, “काय चाललंय ताई आणि जिजू बघतील ना…” पुढे विवेक म्हणतो, “कोण दादा वहिनी ना?” यानंतर प्रोमोत मृणास दुसानिस आणि विजय आंदळकर यांची झलक दिसते. या दोघांचं अरेंज मॅरेज ठरलेलं असतं मात्र, भटजी त्यांना तुमचं लग्न जमणार नाही असं हात पाहून सांगतो. यावर मृणाल विजयची समजूत काढताना प्रोमोमध्ये दिसते. एवढ्यात मॉसमध्ये लहान मुलांची ट्रेन आवाज करत येते. मागून गाडी येतेय हे पाहताच विवेक मृणालला खेचतो, तर विजय ज्ञानदा बाजूला करतो आणि इथेच मालिकेचा मुख्य ट्विस्ट आहे. आता मालिकेचं कथानक कसं असणार आणि यामध्ये अजून कोणकोणते कलाकार झळकणार याचा उलगडा १६ डिसेंबरला होणार आहे.

हेही वाचा : ५० दिवसांनंतर ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट आता ओटीटीवर, कोणत्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला? जाणून घ्या…

मृणाल, ज्ञानदा, विवेक आणि विजय यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका १६ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाह ( Star Pravah ) वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे. सध्या या वेळेला ‘साधी माणसं’ ही मालिका प्रसारित केली जाते. मात्र, या नव्या मालिकेसाठी जुन्या मालिकेची वेळ बदलण्याची दाट शक्यता आहे. तर, दुपारी प्रसारित होणारी लग्नाची बेडी मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

दरम्यान, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या नव्या मालिकेच्या ( Star Pravah ) प्रोमोवर नेटकऱ्यांसह कलाविश्वातील कलाकार मंडळींनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर, मृणालच्या पुनरागमनासाठी तिला चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Star pravah new serial lagnanantar hoilach prem starring mrunal dusanis first promo out now sva 00