Star Pravah New Serial Lagnanantar Hoilach Prem : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर आता येत्या काही दिवसात ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मृणाल दुसानिसचं छोट्या पडद्यावर चार वर्षांनी पुनरागमन असल्याने सर्वांच्या मनात या मालिकेबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मालिकेच्या शीर्षकावरुनच मालिकेची गोष्ट काय असेल याचा अंदाज येतो. लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात असं म्हणतात. ज्या व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम करतो तिच व्यक्ती आयुष्यभर जोडीदार म्हणून लाभायला नशीब लागतं. मात्र प्रत्येकाच्याच नशिबात हे सुख नसतं. नात्यातल्या या हळुवार धाग्याची गोष्ट म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका.

१६ डिसेंबरपासून सायंकाळी ७ वाजता ही नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येईल. जवळपास ४ वर्षांनंतर मृणाल दुसानिस या मालिकेतून पुनरागमन करणार आहे. नंदिनी मोहिते पाटील असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून समाजकार्याची आवड असणारी आणि सतत इतरांच्या हितासाठी झटणारी तिची व्यक्तिरेखा आहे. ‘स्टार प्रवाह’च्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अप्पू म्हणजेच ज्ञानदा रामतीर्थकर या मालिकेत मृणालच्या बहिणीची म्हणजेच काव्या मोहिते पाटील ही भूमिका साकाणार आहे. हजरजबाबी, प्रेमळ आणि खोडकर असणारी काव्या आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत असते.

Navri mile hitlarla
सासरी परत येताच लीलाने केले एजेकडे दुर्लक्ष; तिन्ही सुनांना कामाला लावत म्हणाली, “आमच्यातील नाते…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
death of a boy, Pimpri, case registered doctors,
पिंपरी : चिमुकल्याच्या मृत्यूप्रकरणी तीन डॉक्टरसह दोन परिचारिकांवर गुन्हा
sukh mhanje nakki kay asta star pravah serial off air
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका संपणार! ४ वर्षे गाजवलं अधिराज्य, शेवटच्या दिवसाच्या शूटिंगचा व्हिडीओ आला समोर
Goa Boycott Viral Post man called tourist trap for inflation and dirty beaches debate broke out
“गोवा म्हणजे पर्यटकांना जाळ्यात अडकवण्याचा सापळा”, गोव्यातील पर्यटनावर युजर्सचा संताप; म्हणाले, ‘घाणेरडे…
video of school students hugging each other in classroom went viral on social Media obscene video viral
भरवर्गात त्यानं तिला…, शाळेत विद्यार्थ्यांचे अश्लील चाळे; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही तर हद्दच…”
Mumbai Airport Ganja, Ganja seized, Mumbai, Ganja,
मुंबई : विमानतळावरून साडेपाच कोटींचा गांजा जप्त, आरोपीला अटक

हेही वाचा : ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याची लगीनघाई! होणाऱ्या पत्नीसह केलं प्री-वेडिंग शूट, हळदीला सुरुवात; फोटो आले समोर

‘देवयानी’नंतर जवळपास ८ वर्षांनंतर विवेक सांगळे ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत दिसणार आहे. मिश्किल स्वभावाचं जन्नेजय हे पात्र तो या मालिकेत साकारणार आहे. ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतला युवराज म्हणजेच अभिनेता विजय आंदळकर या मालिकेत जन्मेयजच्या मोठ्या भावाची म्हणजेच पार्थ देशमुख ही भूमिका साकारणार आहे. शांत आणि सुस्वभावी असणारा पार्थ सहसा कुणाच्या वाकड्यात शिरत नाही. वेगवेगळ्या स्वभावाच्या या व्यक्तिरेखा कशा एकत्र येतात हे पहाणं उत्सुकतेचं असेल.

मालिकेची संपूर्ण स्टारकास्ट आली समोर

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत मृणाल दुसानिस, ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे, विजय आंदळकर, अविनाश नारकर, ऋजुता देशमुख, कश्मिरा कुलकर्णी, अनुष्का पिंपुटकर, प्रसन्न केतकर, संयोगिता भावे, आभा वेलणकर, विशाल कुलथे, श्रेयस कदम, स्नेहल चांदवडकर अशा अनेक दमदार कलाकारांची फौज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा : रितेशची बाबा म्हणून जबाबदारी, मातृत्व अन् मुलांचे संस्कार; जिनिलीयाने केलं पालकत्वावर भाष्य, देशमुखांची सून म्हणाली…

नव्या मालिकेविषयी सतीश राजवाडे सांगतात, “प्रेमविवाहावर भाष्य करणाऱ्या मालिका आपण याआधी पाहिल्या आहेत. पण, या अरेंज मॅरेजची गोष्ट थोडी वेगळी आहे. लग्नानंतर त्या व्यक्तीवर प्रेम हे होतंच. लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात असं म्हटलं जातं. त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी जे नशिबात आहे ते होणारच. अशीच एक गुंतत जाणारी आणि गुंतवून ठेवणारी हृदयस्पर्शी मालिका आम्ही रसिकांच्या भेटीस घेऊन येत आहोत.”

Story img Loader