Star Pravah New Serial Tu Hi Re Maza Mitwa : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या दोन नव्या मालिकांपाठोपाठ आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचं नाव आहे ‘तू ही रे माझा मितवा’. या नव्याकोऱ्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला शर्वरी जोग आणि अभिजीत आमकर यांची फ्रेश जोडी येणार आहे. ही मालिका येत्या २३ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रत्येक मालिकेत जसा मुख्य नायक आणि नायिका असते. तसा प्रत्येक कथेचा एक खलनायक सुद्धा असतो. या मालिकेत खलनायकाची भूमिका अभिनेता आशुतोष गोखले साकारणार आहे. याबद्दल जाणून घेऊयात…

हेही वाचा : Year Ender 2024 : विकी कौशलचं ‘तौबा-तौबा’ ते ‘सजनी’; वर्षभरात ‘या’ १० गाण्यांनी घातला धुमाकूळ, पाहा संपूर्ण यादी…

‘रंग माझा वेगळा’ अभिनेता नव्या भूमिकेत…

‘स्टार प्रवाह’च्या ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला कार्तिक इनामदार अर्थात अभिनेता आशुतोष गोखले लवकरच ‘तू ही रे माझा मितवा’ या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने आशुतोष पहिल्यांदाच खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. राकेश भोसले असं त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव असून अतिशय विक्षिप्त स्वभावाचं हे पात्र आहे. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत आशुतोषने साकारलेल्या कार्तिक इनामदार या पात्राला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. या मालिकेत आदर्श पती आणि आदर्श मुलगा साकारल्यानंतर आशुतोषने नवा प्रयोग करण्याचं ठरवलं आहे आणि त्यासाठीच त्याने ही आव्हानात्मक भूमिका स्वीकारली आहे.

नव्या भूमिकेविषयी सांगताना आशुतोष म्हणाला, “याआधी बऱ्याचदा मला खलनायक साकारण्यासाठी विचारणा झाली होती. ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेतून मी पहिल्यांदा खलनायकाची भूमिका साकारणार आहे. खरंतर थोडं दडपण आहे. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेमध्ये सकारात्मक भूमिका मी साकारली. मात्र, मालिकेच्या शेवटच्या टप्प्यात कार्तिक हे पात्र खलनायकी झालं होतं. त्यामुळे अभिनयाचे वेगवेगळे रंग प्रेक्षकांनी याआधीही अनुभवले आहेत. राकेश या पात्राला कसा प्रतिसाद मिळतोय याची प्रचंड उत्सुकता आहे.”

हेही वाचा : लवकरच बंद होणाऱ्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचं कार्तिकी गायकवाडशी आहे खास कनेक्शन, गायिका पोस्ट करत म्हणाली….

Star Pravah New Serial Tu Hi Re Maza Mitwa

दरम्यान, सध्या या मालिकेत शर्वरी जोग, अभिजीत आमकर, आशुतोष गोखले, रुपल नंद, मधुरा जोशी हे कलाकार झळकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आता यामध्ये आणखी कोणते कलाकार झळकणार हे लवकरच स्पष्ट करण्यात येईल.