Star Pravah Parivaar Puraskar 2024 Winner List : ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४’ हा सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रम पार पडल्यावर आता सगळ्याच विजेत्यांची नावं समोर आली आहेत. गेल्या काही वर्षांपासून मराठी वाहिन्यांमध्ये स्टार प्रवाह टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानी आहे. त्यामुळे या वाहिनीची कोणती मालिका यंदा सर्वोत्कृष्ट ठरणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं.
स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा चालू होती. या कार्यक्रमात सगळ्याच कलाकारांनी जबरदस्त परफॉर्मन्स करून लक्ष वेधून घेतलं. यंदा कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा ईशा केसकर, तेजश्री प्रधान व अभिजीत खांडकेकर यांनी सांभाळली होती. याशिवाय विशाखा सुभेदार व पंढरीनाथ कांबळे यांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. आता पुरस्कारांमध्ये कोणी बाजी मारली जाणून घेऊयात…
गेल्या वर्षभरापासून स्टार प्रवाहवर ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. मालिकेची लोकप्रियता आणि प्रेक्षकांनी दिलेल्या मतांच्या आधारे यंदाच्या ‘स्टार प्रवाह महामालिका’ या पुरस्कारावर ‘ठरलं तर मग’ने नाव कोरलं आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट आई-वडील, सासू-सून, खलनायिका, जोडी, कुटुंब हे महत्त्वाचे पुरस्कार कोणी जिंकले जाणून घेऊयात…
‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४’ विजेत्यांची संपूर्ण यादी
१. सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य ( स्त्री ) : गुंजा – कुन्या राजाची गं तू राणी
२. सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य ( पुरुष ) : सागर – प्रेमाची गोष्ट
३. सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा ( स्त्री ) : सावनी – प्रेमाची गोष्ट
४. सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा ( पुरुष ) : मल्हार – तुझेच मी गीत गात आहे
५. सर्वोत्कृष्ट निवेदक : वैदेही परशुरामी, सारा
६. सर्वोत्कृष्ट आई : मुक्ता – प्रेमाची गोष्ट
७. सर्वोत्कृष्ट वडील : अन्ना – मन धागा धागा
८. सर्वोत्कृष्ट भावंड : कला, नैना, काजल – लक्ष्मीच्या पावलांनी
९. सर्वोत्कृष्ट मुलगी : कला – लक्ष्मीच्या पावलांनी
१०. महाराष्ट्राचा धमाका : सिद्धार्थ जाधव
११. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व : सिंधू – लग्नाची बेडी
१२. महाराष्ट्राची लक्षवेधी जोडी : पिंकी आणि युवराज – पिंकीचा विजय असो
१३. सर्वोत्कृष्ट खलनायिका : रागिणी ( शुभविवाह ), सावनी ( प्रेमाची गोष्ट )
१४. सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडी : नित्या व अधिराज ( सुख म्हणजे नक्की काय असतं )
१५. सर्वोत्कृष्ट अनुरुप जोडी : सायली-अर्जुन – ठरलं तर मग
१६. सर्वोत्कृष्ट सासू : रमा आई – अबोली
१७. सर्वोत्कृष्ट सून : रमा – मुरांबा
१८. सर्वोत्कृष्ट पती : सार्थक – मन धागा धागा जोडते नवा
१९. सर्वोत्कृष्ट पत्नी : भूमी – शुभविवाह
२०. विशेष सन्मान : आई कुठे काय करते
२१. सर्वोत्कृष्ट परिवार : सुभेदार कुटुंब- ठरलं तर मग
२२. महाराष्ट्राची महामालिका : ठरलं तर मग
हेही वाचा : Video: ‘साधी माणसं’नंतर ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेची घोषणा, पूजा बिरारी-विशाल निकमसह ‘हे’ कलाकार झळकणार
दरम्यान, ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४’ सोहळ्यातील विजेत्या कलाकारांवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. याशिवाय वाहिनीने ‘घरोघरी मातीच्या चुली’ आणि ‘साधी माणसं’ पाठोपाठ आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे. ‘येड लागलं प्रेमाचं’ या नव्या मालिकेत पूजा बिरारी आणि विशाल निकम यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.