Star Pravah Parivaar Puraskar 2025 Awards Winners List : ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळा २०२५ नुकताच पार पडला. यंदा या सोहळ्याचं पाचवं वर्ष होतं. यामुळेच अनेक दिग्गज कलाकारांनी या सोहळ्यात उपस्थिती लावली होती. पद्मश्री महाराष्ट्रभूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा या सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात आला. तर, ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित तिची निर्मिती असलेल्या ‘पंचक’ सिनेमाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियरच्या निमित्ताने या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिली होती.
‘स्टार प्रवाह’ पुरस्कार सोहळ्याची सुरुवात नायिकांच्या जबरदस्त परफॉर्मन्सने झाली. यानंतर मृणाल दुसानिस आणि अभिजीत आमकर या दोन कलाकारांनी पुरस्कार सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी हाती घेतली. ‘स्टार प्रवाह’च्या १४ मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या जोड्या, खलनायक, मालिकांमध्ये काम करणारी ज्येष्ठ कलाकारमंडळी यांनी या पुरस्कार सोहळ्यात काही विशेष परफॉर्मन्स सादर केले.
या सोहळ्यात सर्वजण आतुरतेने वाट पाहात होते ती पुरस्कारांची. सलग दुसऱ्या वर्षी ‘स्टार प्रवाह’ पुरस्कार सोहळ्यात वाहिनीची टीआरपीमध्ये नंबर १ ला असलेली मालिका ‘ठरलं तर मग’ने बाजी मारली आहे. गेल्यावर्षी सुद्धा ‘ठरलं तर मग’ महाराष्ट्राची महामालिका ठरली होती.
याशिवाय ‘सर्वोत्कृष्ट परीक्षक पसंती मालिका’ होण्याचा बहुमान ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेला मिळाला आहे. यंदा कोणाला कोणते पुरस्कार मिळाले जाणून घेऊयात…
स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५ – संपूर्ण विजेते, पाहा यादी
- सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य स्त्री – नंदिनी ( लग्नानंतर होईलच प्रेम )
- सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य पुरुष – तेजस ( थोडं तुझं आणि थोडं माझं )
- सर्वोत्कृष्ट आई – शुभा ( आई आणि बाबा रिटायर होत आहेत )
- सर्वोत्कृष्ट वडील – यशवंत ( आई आणि बाबा रिटायर होत आहेत )
- सर्वोत्कृष्ट मुलगी – मीरा ( साधी माणसं )
- सर्वोत्कृष्ट भावंडं – पार्थ, जीवा, युग, काव्या, नंदिनी, आरुषी ( लग्नानंतर होईलच प्रेम )
- सर्वोत्कृष्ट पती – हृषिकेश ( घरोघरी मातीच्या चुली )
- सर्वोत्कृष्ट पत्नी – मुक्ता, ( प्रेमाची गोष्ट ) आणि कला ( लक्ष्मीच्या पाऊलांनी )
- सर्वोत्कृष्ट खलनायक किंवा खलनायिका – ऐश्वर्या ( घरोघरी मातीच्या चुली ) आणि प्रिया ( ठरलं तर मग )
- सर्वोत्कृष्ट त्रिकुट – आकाश, भूमी, रागिणी ( शुभविवाह )
- सर्वोत्कृष्ट सून – जानकी ( घरोघरी मातीच्या चुली )
- सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडी – अर्णव-ईश्वरी ( तू ही रे माझा मितवा )
- सर्वोत्कृष्ट रोमँटिक जोडी – अक्षय-रमा ( मुरांबा )
- सर्वोत्कृष्ट अनुरुप जोडी – राया-मंजिरी ( येड लागलं प्रेमाचं )
- सर्वोत्कृष्ट सासू – निरुपा ( साधी माणसं )
- सर्वोत्कृष्ट सासरे – सुधाकर ( साधी माणसं )
- सर्वोत्कृष्ट धडाकेबाज सदस्य ( अबोली )
- सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा ( पुरुष ) – अर्णव ( तू ही रे माझा मितवा )
- सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा ( स्त्री ) – मानसी ( थोडं तुझं आणि थोडं माझं )
- स्टार प्रवाह विशेष सन्मान – ( उदे गं अबे मालिका )
- सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम – ( आता होऊ दे धिंगाणा )
- सर्वोत्कृष्ट निवेदक – समृद्धी केळकर ( मी होणार सुपरस्टार )
- सर्वोत्कृष्ट वेशभूषा – ( लग्नानंतर होईलच प्रेम )
- सर्वोत्कृष्ट परीक्षक पसंती मालिका – ( आई आणि बाबा रिटायर होत आहेत )
- सर्वोत्कृष्ट परिवार – चांदेकर परिवार – ( लक्ष्मीच्या पाऊलांनी )
- सर्वोत्कृष्ट प्रेक्षकपसंती महामालिका – ( ठरलं तर मग )
दरम्यान, ‘स्टार प्रवाह’ पुरस्कार सोहळ्यात विजयी ठरलेले कलाकार आता पोस्ट शेअर करून प्रेक्षकांचे आणि वाहिनीचे आभार मानत आहेत. रेश्मा शिंदे, समृद्धी केळकर, अभिजीत आमकर या कलाकरांनी प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.