Star Pravah Parivar Awards 2024 : ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४’ या कार्यक्रमाचं प्रक्षेपण आज ( १७ मार्च ) सायंकाळी स्टार प्रवाह वाहिनीवर करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून सगळ्या मराठी वाहिन्यांमध्ये स्टार प्रवाह टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. तर, यावर सुरू असणारी ‘ठरलं तर मग’ मालिका छोट्या पडद्यावर गेली दीड वर्षे अधिराज्य गाजवत आहे. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात कोण बाजी मारणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली असतानाच जुई गडकरीने पोस्ट शेअर करत ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
जुई गडकरी व अमित भानुशाली यांच्या मुख्य भूमिका असणारी ‘ठरलं तर मग’ मालिका यंदा ‘स्टार प्रवाह’ची महामालिका ठरली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. गेली दीड वर्षे ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. सायली-अर्जुनची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. त्यामुळे साहजिकच यंदाच्या ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४’मध्ये या मालिकेचा दबदबा पाहायला मिळाला.
हेही वाचा : Video : लग्नाची वरात! क्रिती खरबंदा-पुलकित सम्राटचा जबरदस्त डान्स; ‘असा’ पार पडला गृहप्रवेश, व्हिडीओ व्हायरल
जुई गडकरीने पोस्ट शेअर करत मालिकेने महत्त्वाच्या पुरस्कारांवर नाव कोरल्याचं जाहीर केलं आहे. स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात ‘ठरलं तर मग’ मालिकेने महाराष्ट्राची महामालिका व सर्वोत्कृष्ट परिवार हे पुरस्कार पटकावले आहेत. याशिवाय अर्जुन-सायली यंदाची ‘सर्वोत्कृष्ट जोडी’ ठरले आहेत.
दरम्यान, जुई गडकरीने शेअर केलेल्या या पोस्टवर सध्या मालिकेचे चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. गेल्या वर्षभरापासून ‘ठरलं तर मग’ टीआरपीत आघाडीवर असल्याने यंदा ही मालिका सर्वोत्कृष्ट ठरेल असा अंदाज आधीच प्रेक्षकांनी वर्तवला होता.