स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली होती. या मालिकेत कार्तिक आणि दीपाच्या केमिस्ट्रीचे अनेक चाहते आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत अनेक ट्वीस्ट येत असल्याचे पाहायला मिळत आहेत. मात्र आता या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

‘रंग माझा वेगळा’ ही मालिका गेल्या ३ वर्षांपासून सुरु आहे. या मालिकेने टीआरपीचे अनेक रेकॉर्ड मोडले होते. या मालिकेद्वारे दीपा आणि कार्तिक यांची अनोखी लव्हस्टोरी दाखण्यात आली होती. याद्वारे दीपाने काळ्या रंगाकडे पाहायचा सौंदर्याचा दृष्टिकोन बदलला होता.
आणखी वाचा : ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दीपिका आणि कार्तिकी एका भागासाठी घेतात इतके मानधन? जाणून घ्या

पण त्यानंतर काही महिन्यांपूर्वी या मालिकेनं १४ वर्षांचा लीप घेतला. दीपा आणि कार्तिक यांच्या नात्यामध्ये सारं काही बदललं होतं. हिरो असणारा कार्तिक आता खलनायकी भूमिकेत दिसत होता. या लीपनंतर प्रेक्षकांनी मोठी नाराजी व्यक्त केली होती. प्रेक्षकांची ही नाराजी घालवण्यासाठी विविध ट्वीस्ट आणण्याचाही प्रयत्न केला गेला. पण ही मालिका दिवसेंदिवस रटाळ होत असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली होती.

त्यानंतर अखेर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आता मालिकेच्या शेवटी मात्र आयेशाची स्मृती परत येणार असल्याचं दाखवण्यात येणार आहे. त्याबरोबरच ती तिने केलेल्या चुका मान्य करणार आहे. यानंतर मालिकेच्या शेवटी पुन्हा एकदा कार्तिक आणि दीपाचा सुखी संसार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटींग २२ जुलै रोजी पार पडले.

आणखी वाचा : ‘रंग माझा वेगळा’मधील कार्तिकी फेम साईशा भोईरनं सोडली मालिका, कारण देताना म्हणाली “मला खूप…”

‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या जागी आता अभिनेत्री तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमोही समोर आला आहे. या मालिकेत तेजश्री प्रधान ही ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेता राज हंचनाळे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Story img Loader