मालिकाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे तेजश्री प्रधान. तेजश्रीनं आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. तिची कुठलीही मालिका असो प्रेक्षक वर्ग त्या मालिकेवर भरभरून प्रेम करतो. आता बऱ्याच काळाच्या अवधीनंतर तेजश्री ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यामुळे सध्या या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – “…यामुळे सेटवर एका क्षणात शिवानी रांगोळेला येतं रडू” ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम ऋषिकेश शेलारनं केली पोलखोल

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

तेजश्रीची ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका उद्यापासून रात्री ८ वाजता पाहायला मिळणार आहे. गेल्या ४ वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मालिका ‘रंग माझा वेगळा’चा आज शेवटचा महाएपिसोड असणार आहे. त्यानंतर उद्यापासून या मालिकेची जागा ‘प्रेमाची गोष्ट’ घेणार आहे.

या नव्या मालिकेत तेजश्री व्यतिरिक्त राज हंचनाळे, शुभांगी गोखले, अपूर्वा नेमळेकर, संजीवनी जाधव असे बरेच पाहायला मिळणार आहे. याचनिमित्तानं ‘स्टार प्रवाह’नं तेजश्रीचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तिला मालिकेतील कलाकारांचं एका शब्दात वर्णन करायला सांगितलं आहे.

हेही वाचा – “…म्हणून माझ्या लग्नात दाक्षिणात्य पद्धतीचा पोशाख होता”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम शिवानी रांगोळेनं सांगितला खऱ्या लग्नाचा किस्सा

तेजश्रीला सुरुवातीला शुभांगी गोखले यांचं एका शब्दात वर्णन करायला सांगितलं. तेव्हा ती म्हणाली की, “अभ्यासू.” त्यानंतर तिला राजचं एका शब्दात वर्णन करायला सांगितला. यावर तेजश्री म्हणाली, “कूल.” मग तिला मालिकेतील बालकलाकार सईचं एका शब्दात वर्णन विचारलं आणि तेजश्री म्हणाली की, “शांत.” यानंतर तिनं अपूर्वा नेमळेकरचं वर्णन एका शब्दात केलं. ती म्हणाली की, “अपूर्वा आणि माझं अजून एकत्र काम सुरू झालं नाहीये. पण हॉट.”

हेही वाचा – “भारतात मुस्लिम आहेत म्हणून तुम्ही हिंदू आहात” किरण मानेंनी शेअर केलेलं मीम चर्चेत; म्हणाले, “एका फटक्यात….”

हेही वाचा – “तरुण राहण्यासाठी गोळ्या खातोय”, क्रांती रेडकरनं अभिजीत पानसेंबरोबर शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

दरम्यान, अपूर्वा या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणार आहे. ‘सावनी’ असं तिच्या भूमिकेच नाव आहे. यापूर्वी अपूर्वा ‘रावरंभा’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिनं ‘शाहीन आपा’ ही भूमिका साकारली होती.

Story img Loader