‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेने जवळपास साडे तीन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. नुकतंच या मालिकेच्या शेवटच्या १००० व्या भागाचे चित्रीकरण पार पड ले. यावेळी कलाकार भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. नुकतंच अभिनेत्री साक्षी गांधी हिने मालिकेच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

साक्षीने नुकतंच इन्स्टाग्रावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात साक्षीने या मालिकेच्या सुरुवातीपासून अगदी शेवटच्या दिवसापर्यंतचे सर्व व्हिडीओ एकत्र केले आहेत. त्याला तिने भावूक कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “माझ्या पार्थिवावर अंत्यसंस्कार…”, नितीन देसाईंची शेवटची इच्छा काय होती? ND स्टुडिओतील कर्मचाऱ्याचा खुलासा

raveena tandon 8 movies hit in a year
‘या’ अभिनेत्रीने एकेकाळी सेटवर साफ केला कचरा, पहिलाच सिनेमा झाला फ्लॉप; नंतर एकाच वर्षात दिले आठ सुपरहिट सिनेमे
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Shruti Haasan With Parents
“लोक माझ्याकडे बोट दाखवायचे अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्री घटस्फोटित आई-वडिलांना म्हणाली ‘हट्टी’
Aishwarya Narkar and Avinash Narkar Romantic Dance On Ajay Devgan Song Sathiya
“मुंबईत दोन दिवसांचे कपडे घेऊन आले होते अन्…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अपूर्वा गोरेने ईशा पात्राच्या ऑडिशनचा सांगितला मजेशीर किस्सा
Aasiya Kazi Gulshan Nain Wedding date
८ वर्षांचं प्रेम, कुटुंबियांचा विरोध अन्…; ‘ही’ लोकप्रिय मुस्लीम अभिनेत्री ‘या’ दिवशी करणार आंतरधर्मीय लग्न
samantha want to be mother
अभिनेत्री समांथा रूथ प्रभूला व्हायचंय आई, इच्छा व्यक्त करत म्हणाली, “वयाचा विचार…”
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”

साक्षी गांधीची पोस्ट

“२४ फेब्रुवारी २०२० या दिवशी चालू झालेला हा प्रवास आता तुम्हा सगळ्यांच्या आशिर्वादाने , प्रेमामुळे १००० भागांचा टप्पा गाठत आहे. अवनी… अवनी सर्जेराव घोरपडे आणि लग्नानंतरची सहकुटुंब सहपरिवारमध्ये आलेली , सौ. अवनी वैभव मोरे.

जर कुणी मला साक्षी म्हणून मला हाक मारली तर कदाचित पटकन कळणार नाही ,पण अवनी म्हटल्यावर आपसूक ओ.. म्हणते मी. मी नेहमी म्हणते की तुमच्या करिअर च्या सुरुवातीला तुम्हाला इतकं चांगल प्रोजेक्ट मिळणं आणि त्या मालिकेचे १००० भाग होणं ही खरच खूप भाग्याची गोष्ट असते . आणि त्यातली एक भाग्यवान मी. अवनी हे पात्र करत असताना मला सुरुवातीला अंदाज च यायचा नाही.

मी हे जे करतेय ते प्रेक्षकाना आवडत असेल का ? आपण बरोबर करतोय का ? काही चुकतयं का ? आपल्यावर कुणी हसणार नाही ना ?? असे एक ना अनेक प्रश्न पडायचे. पण डोक्यात एक गोष्ट फिक्स होती की चिपळूण ते मुंबईपर्यंत चा पल्ला या negativity साठी नाही गाठलेला. त्यामुळे साक्षी तू कामाप्रती निष्ठा , प्रामाणिकपणा, मिळालेल्या कामाचा आदर ठेव ..या गोष्टी मी स्वतःला सतत सांगायचे.

अवनी या पात्राच्या खूप shades . अवनी अल्लड , हसरी , पटकन रागावणारी , रडणारी , स्पष्टवक्ती , स्वतंत्र , हळवी अशी होती . त्यामुळे खूप सांभाळून हे पात्र वठवाव लागायचं . आणि यासाठी मला भक्कम पाठिंबा , मदत केली , ते म्हणजे आमचे भरत सर. सर आज तुमच्यामुळे अवनी सगळयांना परिचयाची आहे.

पहिल्या दिवशी जितकी भीती होती मनात , तितकंच शेवटच्या दिवशी डोळ्यात पाणी होतं . अवनी या पात्रासाठी शेवटचं तयार होत असताना . ती साडी , ती jewellery , ती टिकली .. अवनी हे पात्र अक्षरशः अंगात भिनलेल .. २ दिवसांच्या वर सुट्टी असेल तर बेचैन व्हायला व्हायचं . आणि याच कारण म्हणजे उत्तम co artist.

खूप भिती असायची मनात , या मोठ्या आर्टिस्ट समोर काही चुकायला नको . fumbles व्हायला नकोत , retakes नकोत . पण सुनील बर्वे दादा , किशोरी आंबिये ताई , नंदिता ताई , @paranjapyesuhas ताई या सगळयांनीच आम्हाला संभाळून घेतलं . माझा onscreen नवरा , आमचे अहो अमेय बर्वे तुला मी खूप त्रास देणारंच आहे इथून पुढे सुद्धा. कोमल , पूजा , आकाश , पश्या , निम्या , मामा , सखी , क्षितिज , श्वेता ताई Love youh खूपपपप”, असे साक्षीने म्हटले आहे.

आणखी वाचा : “का कुणास ठाऊक? रात्री…”, ना. धों. महानोर यांच्या निधनानंतर हेमांगी कवीच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली…

दरम्यान साक्षी गांधीने ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेत अवनी हे पात्र साकारलं होतं. सहकुटुंब सहपरिवार ही तिची पहिलीच मालिका होती. या मालिकेद्वारे ती प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत ती एका श्रीमंत घरात वाढलेली मुलगी असल्याचे दाखवण्यात आले होते. त्यानंतर मग ती एका सर्वसामान्य कुटुंबात येऊन कशाप्रकारे कुटुंबात मिळून मिसळून राहण्याचा प्रयत्न करते, हे दाखवण्यात आले होते.