छोट्या पडद्यावरील सर्वच मालिका या प्रेक्षकांसाठी कायमच खास असतात. या मालिकांच्या निमित्त विविध विषय हाताळले जातात. लवकरच स्टार प्रवाह या वाहिनीवर एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मन धागा धागा जोडते नवा’ असे या मालिकेचे नाव आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमोही समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्टार प्रवाह वाहिनीने नुकतंच इन्स्टाग्रामवर याचा एक प्रोमो शेअर केला आहे. यात अभिनेत्री दिव्या पुगावकर ही मुख्य भूमिकेत दिसत आहे. ‘लग्न झालं की मुलीचा माहेरशी असलेला संबंध खरंच संपतो..?’ अशा आशयाची ही मालिका असणार आहे. येत्या ८ मे पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
आणखी वाचा: “मी बायोपिकसाठी खूप वाट पाहिली”, अंकुश चौधरीचे वक्तव्य चर्चेत, म्हणाला “प्रत्येक वेळी सुबोधच…”

मात्र स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘स्वाभिमान: शोध अस्तित्वाचा’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकतंच या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री पूजा बिरारी हिने पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने स्वत:चा फोटो शेअर करत ‘बिईंग पल्लवी’ असे म्हणतं आभार व्यक्त केले आहेत. नुकतंच या मालिकेचा शेवटच्या भागाचे शूटींग करण्यात आले.

दरम्यान ‘स्वाभिमान: शोध अस्तित्वाचा’ ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर संध्याकाळी ६.३० वाजता प्रसारित व्हायची. मात्र या मालिकेच्या जागी आता ‘मन धागा धागा जोडते नवा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकेसाठी जुन्या मालिकेचे कथानक पटापट पुढे ढकललं जात असल्याचा आरोप प्रेक्षकांकडून केला जात आहे.