Star Pravah Marathi Serial : छोट्या पडद्यावरील वाहिन्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून टीआरपीसाठी चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. येत्या काळात विविध वाहिन्यांवर बहुतांश नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. काही मालिकांमध्ये रंजक वळणं तर, अनेक मालिकांमध्ये नव्या कलाकारांची एन्ट्री होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘स्टार प्रवाह’ ( Star Pravah ) वाहिनीवर दुपारच्या आणि संध्याकाळच्या अशा दोन सत्रात मालिका प्रसारित केल्या जातात. जानेवारी २०२३ मध्ये ‘शुभविवाह’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत अभिनेत्री मधुरा देशपांडे आणि अभिनेता यशोमन आपटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या मालिकेचा नवीन भाग दुपारी २ वाजता प्रसारित केला जातो. दुपारचं प्रक्षेपण असूनही मालिकेचा टीआरपी चांगला आहे.

हेही वाचा : पत्नीची अनेकदा फसवणूक केली, अभिनेत्याचा स्वतःच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल खुलासा; घटस्फोट घेतल्यावर सहा वर्षांनी पुन्हा तिच्याशीच केलं लग्न

‘शुभविवाह’ मालिकेत लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री

अल्पावधीतच ‘शुभविवाह’ ( Star Pravah ) मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मधुरा व यशोमन यांच्याशिवाय कुंजिका, काजल पाटील, विशाखा सुभेदार या कलाकारांनी मालिकेत प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. आता या दमदार कलाकारांच्या फळीमध्ये आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याची भर पडणार आहे. शुभविवाह मालिकेत येत्या काही दिवसात एका नवीन अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे.

‘ती परत आलीये’ मालिका, ‘चारचौघी’ नाटकातून सर्वत्र लोकप्रिय झालेला अभिनेता श्रेयस राजे शुभविवाह मालिकेत एन्ट्री घेणार आहे. या मालिकेत तो पारितोष अवस्थी ही भूमिका साकारणार आहे. त्याची मालिकेत एन्ट्री होणं ही श्रेयसच्या तमाम चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

हेही वाचा : “तेव्हा समोर स्वत: राजसाहेब बसले होते…”, ‘येक नंबर’मध्ये मनसे अध्यक्षांची भूमिका कोणी साकारलीये? अभिनेता म्हणाला…

हेही वाचा : भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारा गायक; एका गाण्यासाठी आकारतो तब्बल तीन कोटी! अरिजीत सिंह, सोनू निगम जवळपासही नाहीत

श्रेयस याबद्दल लिहितो, “पारितोष अवस्थी तुम्हाला भेटायला येतोय. आजपासून ‘शुभविवाह’ या मालिकेत. पाहायला विसरू नका सोमवार ते शनिवार दुपारी २ वाजता. फक्त आपल्या लाडक्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर.”

श्रेयसची ही पोस्ट ‘स्टार प्रवाह’ ( Star Pravah ) वाहिनीने देखील रिशेअर केली आहे. याशिवाय त्याच्या या पोस्टवर मराठी कलाकारांसह चाहत्यांनी कमेंट्स करत त्याला या नव्या भूमिकेसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Star pravah this marathi actor enters marathi serial subhavivah know in details sva 00