Star Pravah New Serial : गेल्या काही महिन्यांमध्ये ‘स्टार प्रवाह’ वाहिनीकडून ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’, ‘तू ही रे माझा मितवा’ अशा तीन मालिकांची घोषणा करण्यात आली. यापैकी ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेचा शुभारंभ नुकताच ( २ डिसेंबर ) पार पडला. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने तब्बल पाच वर्षांनी छोट्या पडद्याचा निरोप घेतल्यावर आता त्याजागी निवेदिता सराफ यांची ही नवीन मालिका सुरू करण्यात आली आहे.
‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेत निवेदिता सराफ आणि मंगेश कदम यांच्या मध्यवर्ती भूमिका आहेत. आता सर्वांना उत्सुकता आहे ती मृणाल दुसानिसच्या कमबॅकची. जवळपास ४ वर्षांनी मृणाल टेलिव्हिजन विश्वात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. १६ डिसेंबरपासून सायंकाळी ७ वाजता ही मालिका ‘स्टार प्रवाह’ ( Star Pravah ) वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे. मृणाल दुसानिस, ज्ञानदा रामतीर्थकर, विजय आंदळकर आणि विवेक सांगळे या कलाकारांच्या या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. त्यामुळे या मालिकेकडून प्रेक्षकांना सुद्धा प्रचंड अपेक्षा आहेत.
कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार?
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेचा स्लॉट घोषित झाल्यावर सध्या संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणाऱ्या ‘साधी माणसं’ मालिकेचं काय होणार असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला होता. अखेर त्याचं उत्तर आता समोर आलं आहे. ‘साधी माणसं’ मालिकेची वेळ आता बदलण्यात आली आहे. ही मालिका आता संध्याकाळी ७ ऐवजी दुपारी १ वाजता प्रसारित केली जाणार आहे. ‘स्टार प्रवाह’च्या ( Star Pravah ) अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शिवानी बावकर आणि आकाश नलावडे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
सध्या दुपारी १ वाजता ‘लग्नाची बेडी’ ही मालिका सुरू आहे. आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेली काही वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अभिनेत्री सायली देवधर आणि संकेत पाठक यांच्या या मालिकेत प्रमुख भूमिका आहेत. आता लवकरच ही मालिका ऑफ एअर होणार आहे.
हेही वाचा : Video: “कसे आहात पुणेकर?” दिलजीत दोसांझने कॉन्सर्टमध्ये मराठीत साधला संवाद, म्हणाला, “मुलगी शिकली…”
दरम्यान, शर्वरी जोगची ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका सुरू झाल्यावर ‘अबोली’ मालिकेची वेळ बदलण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचं काय होणार ( Star Pravah ) हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.