हिंदी कलाकारांच्या मुलांप्रमाणेच मराठी कलाकारांच्या मुलांबद्दल जाणून घेण्यासाठी देखील प्रेक्षक उत्सुक असतात. अनेक मराठी कलाकारांची मुलं अशी आहेत जी मनोरंजन सृष्टीत नसली तरीही सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. यापैकीच एक म्हणजे सुकन्या मोने आणि संजय मोने यांची लेक ज्युलिया. आज तिच्या वाढदिवसानिमित्त सुकन्या मोने यांनी तिच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.
सुकन्या मोने सोशल मीडियावर सक्रिय राहून नेहमीच त्यांच्या कामाबद्दल त्याचप्रमाणे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांची शेअर करत असतात. आतापर्यंत अनेक मुलाखतींमध्ये त्या ज्युलियाबद्दल भरभरून बोलल्या आहेत. तर सध्या ज्युलिया शिक्षणानिमित्त परदेशात राहते. आज तिथेच ती तिच्या मित्रमंडळींबरोबर तिचा वाढदिवस साजरा करत आहे.
आणखी वाचा : “विराजस, आता तरी…” लेकाच्या वाढदिवसानिमित्त मृणाल कुलकर्णी यांनी त्याला दिला ‘हा’ खास सल्ला, पोस्ट चर्चेत
आपल्या लेकीच्या वाढदिवसानिमित्त सुकन्या मोने यांनी त्यांचा एक छान फॅमिली फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत त्या, त्यांचे पती अभिनेते संजय मोने आणि त्यांची मुलगी ज्युलिया दिसत आहेत. हा फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिलं, “Happy birthday dear Julia आज तू सातासमुद्रापार तुझा २१ वा वाढदिवस साजरा करतेय आहेस….आनंद ह्याचा आहे की तू तिकडे जाऊनही तुझं विश्व,तुझे मित्र मैत्रिणी संग्रही केलेस आणि त्यांच्याबरोबर आजचा दिवस साजरा करते आहेस. खूप खूप शुभेच्छा आणि तुला खूप यश मिळो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना!”
हेही वाचा : VIDEO : उर्मिलाच्या ‘बेबी शॉवर’मधील सुकन्या मोनेंचा डान्स पाहिलात का?
सुकन्या मोने यांची ही पोस्ट खूप चर्चेत आली आहे. या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी त्याचप्रमाणे मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी कमेंट्स करत ज्युलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.