गेल्या साडे तीन वर्षांपासून ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सध्या या लोकप्रिय मालिकेचं दुसरं वर्ष सुरू आहे. २० नोव्हेंबर २०२३पासून ‘सुख म्हणजे नक्की असतं’ मालिकेतील गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा पाहायला मिळत आहे. या मालिकेच्या दुसऱ्या पर्वावर जितकं प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. तसंच या मालिकेच्या पहिल्या पर्वालाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या पहिल्या पर्वात अनेक कलाकार मंडळी झळकले होते, ते सध्या दुसऱ्या पर्वात पाहायला मिळत नाहीयेत. त्यापैकी एक म्हणजे उदय. अभिनेता संजय पाटीलने उदय ही भूमिका साकारली होती. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचा हाच अभिनेता काही दिवसांपूर्वी बाबा झाला. संजयला २८ फेब्रुवारीला होळीच्या दिवशी कन्यारत्न झालं. ही आनंदाची बातमी त्याने सोशल मीडियाद्वारे दिली होती. आता संजयने आपल्या लाडक्या लेकीच्या नावाचा खुलासा केला आहे.

हेही वाचा – ‘भाई’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आला हृदयविकाराचा झटका अन्…; सागर देशमुखने सांगितला ‘तो’ गंभीर प्रसंग, म्हणाला…

अभिनेता संजय पाटीलच्या लेकीचं नाव ‘राही’ असं ठेवण्यात आलं आहे. ‘राजश्री मराठी’शी संवाद साधताना संजयने आपल्या लेकीच्या नावाचा अर्थ सांगितला आहे. अभिनेता म्हणाला, “‘राही’ हे नाव कृष्णाशी जोडलेलं आहे. कृष्णाचा अवतार असलेल्या पांडुरंगाची पत्नी देवी आणि ‘राही’ म्हणजे अध्यात्मिक पथावर वाटचाल करणारी असा अर्थ आहे.”

हेही वाचा – Video: कोणाला मारलं डोक्यात, तर कोणाला दिला दम; जॅकी श्रॉफ यांनी चाहत्यांना दिलेली वागणूक पाहून भडकले नेटकरी, म्हणाले…

दरम्यान, संजयने मुलीचं नाव जाहीर करताच कलाकार मंडळींसह चाहत्यांनी त्याचा या पोस्टवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री भक्ती रत्नपारखी, गिरीजा प्रभू, अभिषेक गावकर, आशा ज्ञाते, अश्विनी कासार अशा अनेकांनी ‘राही’ हे नाव खूप सुंदर असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

Story img Loader