‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’. नुकताच या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. गेल्या साडे चार वर्षांपासून ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेतील गौरी, जयदीप व्यतिरिक्त प्रत्येक पात्र घराघरात पोहोचलं. तसंच मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं होतं. त्यामुळे मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. पण, २३ डिसेंबरला ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका ऑफ एअर झाली. याच मालिकेतील आता एक अभिनेत्री नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यासंदर्भात तिने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील अभिनेत्री अपर्णा गोखले लवकरच नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अपर्णा गोखलेने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत रेणुका शिर्केची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका चांगलीच गाजली. पण, आता मालिकेने प्रेक्षकांच्या निरोप घेतल्यानंतर अपर्णा वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सावली होईन सुखाची’ मालिकेत अपर्णा पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – “इंडस्ट्रीतल्या वर्चस्ववाद्यांनी माझ्या पोटावर मारलेली लाथ….”, निळू फुलेंच्या नावाने पहिला पुरस्कार जाहीर झाल्यानंतर किरण मानेंची पोस्ट, म्हणाले…

अभिनेत्री अपर्णा गोखले पोस्ट करत म्हणाली, “गेली साडे चार वर्षे रसिकांच्या मनावर आधिराज्य करणारी ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने रविवारी निरोप घेतला. ज्याचा शेवट गोड, ते सगळे गोड. वाईटाचा नाश झाला, सत्याचा विजय झाला. हे सुख शोधत असतानाच मला ‘माझी माणसं’ मिळाली. दोन-अडीच वर्षे ‘सन मराठी’वर ही मालिका गाजत होती. सुख म्हणजे शोधताना मला माझी माणसं मिळाली, नवीन नाती जोडली गेली. आयुष्यभरासाठी, हक्काची म्हणता येतील अशी माणसं भेटली आणि बघता बघता मला ‘सुखाची सावली’ देऊन गेली. रेणुका वर जेवढे प्रेम केलं, मीना ला जसं आपलंस केलं, तसंच प्रेम आता आसावरीवर सुद्धा करा. पुढच्या नवीन प्रवासात पण अशीच साथ द्या, आशीर्वाद असूद्या, प्रेम असूद्या. पाहत राहा माझी नवी मालिका ‘सावली होईन सुखाची’ ‘सन मराठी’वर दरारोज रात्री ९ वाजता.”

हेही वाचा – बहुप्रतीक्षित Squid Game 2 वेब सीरिजसाठी तयार व्हा; कधी, कुठे प्रदर्शित होणार? जाणून घ्या…

हेही वाचा – केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार

दरम्यान, ‘सावली होईन सुखाची’ या मालिकेचं नवं पर्व सुरू झालं आहे. या मालिकेत ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मधील अभिनेता अमेय बर्वे आणि अभिनेत्री प्रतिक्षा पोकळे प्रमुख भूमिकेत आहेत. ‘सावली होईन सुखाची’मध्ये अमेय विराजस आणि प्रतिक्षा राधा उर्फ बिट्टीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sukh mhanje nakki kay asta fame aparna gokhale appear in savali hoin sukhachi serial pps