‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत आता मोठा ट्विस्ट येणार आहे. २५ वर्षांनंतरचं मालिकेचं कथानक दाखवण्यात येणार आहे. गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा २० नोव्हेंबरपासून पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या मालिकेतील अनेक कलाकार या नव्या भागामध्ये झळकणार नाहीयेत. अभिनेत्री माधवी निमकर, कपिल होनराव, अर्पणा गोखले, गणेश रेवडेकर, भक्ती रत्नपारखी असे बरेच कलाकार येत्या काळात मालिकेत दिसणार नाहीयेत. त्यामुळे हे कलाकार सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करताना दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतीच अभिनेत्री भक्ती रत्नपारखी हिने एक भली मोठी पोस्ट लिहिली आहे. भक्ती ही ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील रिप्लेसमेंट होती. तिने साकारलेली देवकी सुरुवातीला अभिनेत्री मीनाक्षी राठोडने साकारली होती. पण तिच्या एक्झिटनंतर भक्तीची एन्ट्री झाली. त्यावेळी देवकी हे पात्र खूपच लोकप्रिय झालं होतं. त्यामुळे मीनाश्री प्रमाणे तितक्याच ताकदीने भक्ती हे पात्र निभावू शकते का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. पण भक्तीने देवकी हे पात्र उत्कृष्टरित्या साकारलं. मात्र आता देवकी गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माच्या कथेत दिसणार नाहीये. त्यानिमित्ताने भक्तीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा – Video: हार्दिक जोशीच्या ‘जाऊ बाई गावात’ शोमधील दोन दमदार स्पर्धक जाहीर, कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या…

भक्तीने लिहीलं आहे,”‘मॅडहेड’ देवकी माझ्याबरोबर नेहमी राहील… आज माझा ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मधला शेवटचा एपिसोड…पण हे सुख माझ्याबरोबर नेहमी राहील…मी कोणाची तरी रिप्लेसमेंट केलेलं हे माझं पहिलं पात्र…ते ही इतकं महत्त्वाच आणि गाजलेलं…ज्यात मी कधीच बोलले नाही ती भाषा मला बोलायची होती…खूप वेगळ्या शेड्स होत्या…पण ते करताना मला सगळ्यात मोठी मदत झाली ती अर्थातच आमचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे सर…त्यांनी सुरुवातीला आणि अगदी शेवटपर्यंत माझा आत्मविश्वास वाढवला…मला देवकी सापडायला मदत केली..त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीने अभिनेत्री म्हणून मला खूप छान घडवलं आहे, खूप शिकवलं आहे…आणि ही गोष्ट माझ्याबरोबर नेहमी राहिल..चंदू सर खूप धन्यवाद…तुमच्या बरोबर काम करायची संधी मला नेहमी मिळू देत… तुम्ही ग्रेट आहेत. आमची पूर्ण दिग्दर्शनाची टीम, कॅमेरा टीम, मेकअप आणि हेअर टीम, स्पोट दादा…सगळ्यांना खूप खूप धन्यवाद…माधुरी मॅम, अमेय तुमच्याशिवाय हे शक्‍य नव्हतं…कोठारे व्हिजनबरोबर काम करायची ही फक्त सुरुवात आहे…अजून खूप चांगलं काम आपल्याला करायचं आहे…”

हेही वाचा – “अखेरचा हा तुला दंडवत…” ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील अभिनेत्रीची भली मोठी भावुक पोस्ट, म्हणाली…

पुढे अभिनेत्रीने लिहीलं, “माझे सगळे सहाय्यक कलाकार…तुमच्याशिवाय मी देवकी एन्जॉय करू शकले नसते…धन्यवाद…सगळ्यांवर एक एक वेगळी पोस्ट लिहायला पाहिजे एवढे सगळे ग्रेट आहात आणि एवढे माझ्या जवळचे झाला आहात….तुम्हा सर्वांना खूप सारं प्रेम….स्टार प्रवाह चॅनेलवर काम करायला मिळाल यासाठी मी खूप भाग्यवान आहे…धन्यवाद…तुम्ही माझ्यावर विश्‍वास ठेवतात त्याबद्दल…अशीच संधी मला नेहमी मिळेल याची खात्री आहे…आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही सगळे माझे प्रेक्षक…मला देवकी म्हणून स्वीकारलं…माझ्यावर प्रेम केलंत…माझा आत्मविश्वास वाढवला…कारण तुमच्याशिवाय मी हे करूच शकले नसते.. मी आले तेव्हा देवकी हे पात्र मालिकेमध्ये खूप जुन होतं..खूप हिट होतं..त्याची रिप्लेसमेंट करणं माझ्यासाठी खूप मोठा टास्क होता…माझी कोणाबरोबर स्पर्धा नव्हती…ती असेल तर फक्त माझीच माझ्याबरोबर होती…मला ते पात्र समजून घ्यायला तुम्ही वेळ दिला…त्यासाठी खूप खूप धन्यवाद…असेच प्रेम राहूदेत..कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही कलाकार आहोत…तुमचं मनोरंजन करायची संधी मला अशीच मिळत राहू देत…लवकरच भेटूयात एका नवीन भूमिकेत..”

हेही वाचा – भावंडांबरोबर जुई गडकरीने ‘अशा’ पद्धतीने केल्या होत्या चोऱ्या; अभिनेत्री किस्सा सांगत म्हणाली…

हेही वाचा – Video: मुक्ता-सागरच्या ‘प्रेमाची गोष्ट’ पूर्ण करण्याची जबाबदारी घेणार ‘या’ दोन व्यक्ती; ‘असा’ रंगणार महाएपिसोड

दरम्यान, भक्ती प्रमाणे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील अभिनेत्री अपर्णा गोखलेने भावुक पोस्ट लिहिली आहे. तिने मालिकेच्या सेटवरील शेवटच्या दिवसाचा व्हिडीओही शेअर केला आहे; जो चांगलाच चर्चेत आला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sukh mhanje nakki kay asta fame bhakti ratnaparkhi share emotional post over all serial journey pps