विक्रांत मेस्सी आणि मेधा शंकर यांची प्रमुख भूमिका असलेला 12th Fail हा चित्रपट गेल्यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. विधू विनोद चोप्रांच्या या चित्रपटाची सोशल मीडियावर तुफान चर्चा झाली. २० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ६६.५८ कोटींची कमाई केली. या चित्रपटाच्या माध्यमातून रिअल लाइफ जोडप्याची कथा मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली.

खऱ्या आयुष्यातील IPS मनोज शर्मा व IRS श्रद्धा जोशी या जोडप्याची प्रेरणादायी कथा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आली. सर्वत्र त्यांच्या प्रेमकहाणी चर्चा रंगली होती. विक्रांत आणि मेधा यांनी मोठ्या पडद्यावर त्यांच्या भूमिका एकदम उत्तमरित्या साकारल्या. कष्ट, मेहनत, जिद्द आणि प्रेमाच्या जोरावर माणूस कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो ही शिकवण आजच्या तरुणपिढीला या चित्रपटामार्फत मिळाली. यंदाच्या बऱ्याच मानाच्या पुरस्कारांवर 12th Fail चित्रपटाने आपलं नाव कोरलं.

Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
Marathi actress Amruta Deshmukh was welcomed on the sets of Maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुखचं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर झालं ‘असं’ स्वागत, म्हणाली, “ओंकार राऊतने…”
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार

हेही वाचा : “ईडी, सीबीआय नाहीतर रंगाबिल्ला येऊद्या, पण…”, मराठी अभिनेत्याची रोहित पवारांबद्दल पोस्ट; म्हणाले, “आयुष्यात…”

IPS मनोज कुमार शर्मा हे सध्या मुंबई पोलिसात अतिरिक्त आयुक्त आहेत. नुकतीच त्यांची ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या गिरीजा प्रभूने भेट घेतली. गिरीजा आणि IPS मनोज शर्मा यांच्या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “लोकांना जाड आणि बारीक…”, सततच्या ट्रोलिंगमुळे सई लोकूर संतापली; म्हणाली, “अतिशय लाजिरवाणी…”

गिरीजाने फोटो शेअर करत मनोज शर्मा यांना टॅग केलं आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान, अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर गेल्या अनेक वर्षांपासून ती ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेमुळे गिरीजाला घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली आहे.

Story img Loader