मुंबईत स्वतःचं हक्काचं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. असंच स्वप्न ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील मल्हार म्हणजेच अभिनेता कपिल होनरावचं होतं. कपिलचं हे स्वप्न आता पूर्ण झालं आहे. त्याने बायकोसाठी मुंबईत आलिशान घर खरेदी केली आहे. ही आनंदाची बातमी कपिलने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली आहे.

अभिनेता कपिल होनरावने नव्या घराचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो बायकोला सरप्राइज देताना पाहायला मिळत आहे. मुंबईतील आलिशान घर पाहून कपिलची बायको भारावलेली दिसत आहे. कपिलने अंधेरीत नवं घर खरेदी करून आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. याचा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने सुंदर पोस्ट लिहिली आहे.

suresh dhas prajakta mali on santosh deshmukh murder
Prajakta Mali: प्राजक्ता माळीचं नाव का घेतलं? सुरेश धस यांनी केलं स्पष्ट; तक्रारीच्या मुद्द्यावर म्हणाले…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Marathi actor Ruturaj Phadke Bought New House Vastu Shanti video viral
Video: लोकप्रिय मराठी अभिनेत्याने घेतलं स्वतःचं हक्काचं घर; वास्तुशांतीचा व्हिडीओ आला समोर, उखाणा घेताना पत्नी झाली भावुक
Man Travelled Hanging Under Train
Madhya Pradesh : धक्कादायक! रेल्वेखाली चाकांजवळ लटकून तरुणाचा तब्बल २९० किलोमीटरचा प्रवास; Video व्हायरल
Maharashtrachi hasyajatra fame prithvik Pratap share special post for wife Prajakta on her birthday
Video: पत्नीच्या वाढदिवसानिमित्त ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची खास पोस्ट; किती वर्षांची झाली प्राजक्ता? म्हणाला…
Nitish Kumar Reddy Maiden Test Century in IND vs AUS Melbourne Test
IND vs AUS: नितीश रेड्डीचं पहिलं कसोटी शतक! ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर एकटा उभा ठाकला; वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू
Ranbir Kapoor alia bhatt daughter raha Kapoor says bye to paps video goes viral
Video: पापाराझींनी आवाजात देताच राहाची ‘ती’ कृती; आलिया-रणबीर लेकीला पाहून लागले हसायला
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष

हेही वाचा – Video: लोकप्रिय मराठी अभिनेत्याने घेतलं स्वतःचं हक्काचं घर; वास्तुशांतीचा व्हिडीओ आला समोर, उखाणा घेताना पत्नी झाली भावुक

कपिल होनरावरची पोस्ट वाचा…

मुंबईत स्वतःचं घर घेणं आणि तेही अंधेरीसारख्या ठिकाणी…४ कपडे आणि एक छोटी शी बॅग आणि खिशात १५०० रुपये घेऊन…गावावरून अभिनयाचं स्वप्न घेऊन येणाऱ्या माझ्या सारख्या पोरासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मुंबईत आलो तेव्हा भांडूपला १० बाय १०च्या खोलीमध्ये राहताना माझा जीव गुदमरल्या सारखा व्हायचा. काडीपेटीसारखी घर वाटयाची …असं वाटायचं, यार आपण कुठे आलोय?

मुंबई चित्रपटात जशी पाहतो तशी नाहीये. आपण कुठे राहतोय? ऑडिशनसाठी अंधेरीला याचो तेव्हा मोठमोठ्या इमारती पाहिल्या की वाटायचं, यार ही खरी मुंबई, इथे घर असलं पाहिजे. ऑडिशन झालं की मित्रांबरोबर फिरताना उगाच मी बोलायचो इथे घर घेईन, तू तिथे घे…पण त्या वेळी ते फक्त दिवा स्वप्न असायचं. ही मुंबई तुम्हाला लगेच आपलंस नाही करत. खूप परीक्षा घेते. तुमचं टेंपरामेंट चेक करते. खूप वेळा ही मुंबई सोडून घरी परत जावंस वाटायचं. पण माझ्याबरोबर कायम एक खंबीर मुलगी होती. अगदी सुरुवातीपासून ते आज या मुंबईत आणि इंडस्ट्रीमध्ये मी फक्त आणि फक्त तिच्या सोबती मुळे आहे…आणि हे घर सुद्धा तिच्या सोबती शिवाय शक्यचं झालं नसतं…पैसे आले की उधळपट्टी करणारा मी… पण एक एक रुपया जपून ठेवायची अक्कल तिने दिली.

रेणू आज मला खूप आनंद होतोय की, तुला मी हे घर गिफ्ट म्हणून देतोय. हे माझं नाही तर तुझं घर आहे आणि या फाटक्या पोराचा हात ज्या विश्वासाने तू धरलास. आई वडिलांच्या विरोधात जाऊन तू माझ्याशी लग्न केलंस. लग्नानंतर ५ वर्षांनी, इतक्या कमी वयात करोडोच्या वरच घर घेतलं. तू नेहमी बोलतेस .. ‘आप खुद पे विश्वास करो आप कर लोगे’ आज मला खूप आनंद होतोय की, तुझा विश्वास मी सार्थ ठरवला. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.

हेही वाचा – Video: पापाराझींनी आवाजात देताच राहाची ‘ती’ कृती; आलिया-रणबीर लेकीला पाहून लागले हसायला

हेही वाचा – Video: पत्नीच्या वाढदिवसानिमित्त ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची खास पोस्ट; किती वर्षांची झाली प्राजक्ता? म्हणाला…

दरम्यान, कपिल होनरावच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याच्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या लोकप्रिय मालिकेने अलीकडेचं प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेच्या दोन्ही पर्वात कपिल पाहायला मिळाला होता. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेच्या पहिल्या पर्वानंतर कपिल ‘जय जय शनिदेव’, ‘निवेदिता माझी ताई’ या मालिकेत झळकला होता. त्यानंतर ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणबद्दल केलेल्या एका पोस्टमुळे कपिल खूप चर्चेत आला होता. पण, त्यानंतर कपिलने त्या पोस्टमागचा नेमका हेतू स्पष्ट करून ट्रोलर्सचं तोंड बंद केलं.

Story img Loader