‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. २०२० पासून सुरू झालेली ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलं खिळवून ठेवलं आहे. त्यामुळे मालिकेने १०००हून अधिक भागांचा टप्पा पार केला आहे.
सध्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचं दुसरं पर्व सुरू आहे. २० नोव्हेंबर २०२३पासून ‘सुख म्हणजे नक्की असतं’ मालिकेतील गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा पाहायला मिळत आहे. या मालिकेच्या दुसऱ्या पर्वावर जितकं प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. तसंच या मालिकेच्या पहिल्या पर्वालाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या पहिल्या पर्वात अनेक कलाकार मंडळी झळकले होते, ते सध्या दुसऱ्या पर्वात पाहायला मिळत नाहीयेत. त्यापैकी एक म्हणजे मल्हार. अभिनेता कपिल होनरावने मल्हारची भूमिका उत्तमरित्या साकारली होती. हाच कपिल आता एका वेगळ्या रुपात झळकला आहे.
‘सोनी मराठी’ वाहिनीवर कालपासून (८ मे) ‘जय जय शनिदेव’ मालिका सुरू झाली आहे. याच मालिकेत लाडका मल्हार म्हणजे कपिल होनराव वेगळ्या रुपात झळकला आहे. या मालिकेत राजा विक्रमादित्यच्या भूमिकेत कपिल पाहायला मिळत आहे. याचं मोशन पोस्टर सध्या व्हायरल झालं आहे.
हेही वाचा – अद्वैत दादरकरनंतर ‘रमा राघव’ मालिकेत ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री, साकारणार महत्त्वाची भूमिका
कपिल होनरावला वेगळ्या रुपात पाहून इतर कलाकार मंडळींसह चाहते शुभेच्छा देत आहेत. ‘सोनी मराठी’वर ‘जय जय शनिदेव’ नवी मालिका सोमवार ते शुक्रवारी रात्री ९.३० वाजता प्रसारित होतं आहे. या मालिकेत अभिनेता संकेत खेडकरने शनिदेवाची प्रमुख भूमिका साकारली आहे.
हेही वाचा – Video: ‘नाच गं घुमा’ गाण्यावर पूजा सावंतचा बहिणीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, अभिनेता कपिल होनराव ‘जय जय शनिदेव’ मालिकेआधी ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘निवेदिता माझी ताई’ मालिकेत झळकला होता. या मालिकेत अभिनेता अशोक फळदेसाई, अभिनेत्री एतशा संझगिरी आणि बालकलाकार रुद्रांश चोंडेकर प्रमुख भूमिकेत आहेत.