‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. काही महिन्यांपूर्वी या मालिकेने २५ वर्षांचा लीप घेतला. त्यामुळे मालिकेतील बऱ्याच जुन्या पात्रांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यापैकी एक म्हणजे मल्हार. अभिनेता कपिल होनरावने मल्हार हे पात्र उत्तमरित्या साकारलं होतं. त्यामुळे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मधून कपिलची एक्झिट झाल्यापासून तो कोणत्या नव्या भूमिकेत झळकणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं.
अखेर लवकरच प्रेक्षकांचा लाडका मल्हार अर्थाच कपिल नव्या भूमिकेत भेटीस येणार आहे. अलीकडेच सुरू झालेल्या एका नव्या मालिकेत तो झळकणार आहे. याचा प्रोमो नुकताच समोर आला आहे.
हेही वाचा – मुग्धा वैशंपायनने पहिल्यांचं अनुभवलं अंदमानचं विक्राळ रुप, म्हणाली, “२ तासांचा प्रवास…”
अभिनेता कपिल होनराव ‘सोनी मराठी’ वाहिनीच्या ‘निवेदिता माझी ताई’ या मालिकेत दिसणार आहे. ही नवी मालिका १५ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. याच नव्या मालिकेतून कपिल नव्या भूमिकेत झळकणार आहे. याचा प्रोमो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
कपिलच्या या पोस्टवर शालिनी म्हणजे अभिनेत्री माधवी निमकरने प्रतिक्रिया दिली आहे. माधवी म्हणाली, “हे…अभिनंदन…तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. मला माहितीये तू चांगलंच करशील…खूप खूप शुभेच्छा.”
हेही वाचा – Bigg Boss 17: “माझ्या बायकोला मत द्या…”, विक्की जैनचं पत्नी अंकिता लोखंडेसाठी चाहत्यांना आवाहन, म्हणाला…
दरम्यान, ‘निवेदिता माझी ताई’ या नव्या मालिकेत अभिनेता अशोक फळदेसाई, अभिनेत्री एतशा संझगिरी आणि बालकलाकार रुद्रांश चोंडेकर प्रमुख भूमिकेत आहेत. तर अशोक ‘यशोधन’, एतशा ‘निवेदिता’ आणि रुद्रांश ‘असीम’च्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.