Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan : सध्या सर्वत्र ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणची चर्चा सुरू आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रविवारी ( ६ ऑक्टोबर ) मोठ्या दिमाखात पार पडला. गेल्या दोन आठवड्यापासून गैरहजर असलेल्या रितेश देशमुखने महाअंतिम सोहळ्याच जबदरस्त होस्टिंग केलं. यावेळी टॉप-६ सदस्यांचे भन्नाट डान्स पाहायला मिळाले. त्यानंतर टॉप-६मधून एक-एक सदस्य घराबाहेर झाले. सर्वात आधी जान्हवी ९ लाखांचं सुटकेस घेऊन खेळातून बाहेर झाली. त्यानंतर अंकिता, धनंजय आणि निक्की एलिमिनेट झाले. अखेर अभिजीत आणि सूरजने ‘बिग बॉस मराठी’च्या घराच्या लाइट्स बंद केल्या आणि बाहेर आले.

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाविजेता जाहीर करताना ‘कलर्स मराठी’चे हेड्स देखील उपस्थितीत होते. तेव्हा प्रोगोमिंग हेड केदार शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली. सूरजला घेऊन एक चित्रपट करणार असल्याचं केदार शिंदेंनी सांगितलं. या चित्रपटाचं नाव ‘झापुक झुपूक’ असणार आहे. ही सूरजसाठी एक सुवर्णसंधी आहे. याच पार्श्वभूमीवर एका मराठी अभिनेत्याने पोस्ट लिहिली आहे; जी सध्या व्हायरल होतं आहे.

हेही वाचा – ट्रॉफी घेऊन सूरज आला माध्यमांसमोर! हटके लूकने वेधलं लक्ष, ‘बिग बॉस’शी आहे खास कनेक्शन, फोटो एकदा पाहाच

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत झळकलेला अभिनेता कपिल होनरावने सूरज जिंकल्यानंतर एक पोस्ट लिहिली आहे. तसंच या पोस्टबरोबर त्याने व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे. यामध्ये कपिलचे काही ऑडिशनचे व्हिडीओ पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर रिजेक्शन, रिजेक्शन, रिजेक्शन? असं लिहिलं आहे.

हा व्हिडीओ शेअर करत कपिलने लिहिलं आहे, “१० वर्ष प्रायोगिक नाटकं, साडेतीन वर्ष टॉपची मालिका करून, स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध करून…. सिक्स पॅक अ‍ॅब्स करून, अभिनयावर काम करून…रोज ऑडिशन देतोय…पण एक लीडचं ( प्रमुख भूमिका ) ऑडिशन क्रॅक नाही होतं.. पण हा झापुक झुपूक बोलून ‘बिग बॉस’ची ट्रॉफी आणि लीड फिल्म घेऊन गेला राव…अभिनंदन सूरज… झापुक झुपूक शुभेच्छा…गुलीगत शुभेच्छा भावा खूप पुढे जा…”

हेही वाचा – Bigg Boss Marathi : “डीपी दादांवर अन्याय…”, धनंजय पोवारच्या एक्झिटवर नेटकऱ्यांची नाराजी, म्हणाले, “चुकीचा निर्णय”

हेही वाचा – Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंनी ‘बिग बॉस १८’च्या घरात एन्ट्री केल्यानंतर काय घडलं? ते काय म्हणाले? जाणून घ्या…

कपिलच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “नशीब मानावं लागत”, “तुला कुणाच्या सहानुभूतीची गरज नाही…तू कमाल आहेस.”, “सहानुभूतीचा तो राजा आहे”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.