‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने २५ वर्षांचा लीप घेतला. जयदीप-गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेत सुरू झाली. त्यामुळे सध्या जयदीप-गौरी म्हणजेच पुनर्जन्म होऊन आलेल्या अधिराज-नित्याची कथा सुरू आहे. लवकरच मालिकेत काही कलाकार ‘आता होऊ दे धिंगाणा २’च्या पुढील भागात पाहायला मिळणार आहेत. याचे काही प्रोमो समोर आले आहेत. ज्यामध्ये लावणीच्या जुगलबंदीच्या प्रोमोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

‘स्टार प्रवाह’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ‘आता होऊ दे धिंगाणा २’च्या पुढील भागाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये नववर्षाच्या निमित्ताने धिंगाणापुरची जत्रा भरली आहे. या जत्रेमध्ये खास लावणीची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. ही लावणीची जुगलबंदी ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील शालिनी म्हणजे अभिनेत्री माधवी निमकर आणि नित्या म्हणजेच अभिनेत्री गिरीजा प्रभु यांच्यात पाहायला मिळणार आहे.

Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Girls group dance on marathi song Udhalit Yere Gulal Sajana Tu Sham Mi Radhika video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “उधळीत येरे गुलाल सजना तू शाम मी राधिका” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींचा तुफान डान्स
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
Sukh Mhanje Nakki Kay Asta fame Aparna Gokhale appear in savali hoin sukhachi serial
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्री झळकणार आता नव्या भूमिकेत, पोस्ट करत म्हणाली, “माझी नवी मालिका…”
Yogita Chavan & Saorabh Choughule
Video : सातजन्म हाच नवरा मिळूदेत! योगिता चव्हाणला ख्रिसमस आवडतो म्हणून पती सौरभने दिलं ‘असं’ Surpirse, पाहा व्हिडीओ
Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल

हेही वाचा – लग्नानंतर गौतमी देशपांडेची झाली ‘अशी’ अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली…

या प्रोमोमध्ये पिवळ्या रंगाच्या साडीत शालिनी दिसत आहे. ती घायाळ अदाकारीसह लावणी नृत्यू करताना दिसत आहे. तसेच नित्या एमजे स्टाइलमध्ये चंद्रा या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. आता ही लावणीची जुगलबंदी कोण जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हेही वाचा – Video: डेटवर जाण्यासाठी नकार, पण नंतर…; गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकरची फिल्मी लव्हस्टोरी

दरम्यान, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेने २५ वर्षांचा लीप घेतल्यापासून नवीन पात्र पाहायला मिळत आहेत. त्यामुळे अनेक जुन्या पात्राचा प्रवास संपला आहे. यापैकी एक म्हणजे शालिनी. शालिनी सध्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत पाहायला मिळत नाहीये.

Story img Loader